Ahmednagar News : अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर गोरे व डॉ. पंकज जावळे यांच्याबाबत एक मोठा आदेश काढलाय.
त्यांच्या काळात दिलेल्या सर्व बांधकाम परवानगीचे लाच लुचपत प्रतिबंध विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी या संदर्भात मागणी केली होती. त्यानुसार आता हे आदेश काढण्यात आले आहेत.
तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांनी बांधिकाम परवानगी मंजूर करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे ८ लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे प्रकरण नुकतेच घडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक प्रवीण लोखंडे करत आहेत. या प्रकरणात जावळे जामिनावर आहेत. या अनुषंगाने नगररचना विभागात सन २०२१ ते २०२४ या काळात गोरे, जावळे या तत्कालीन आयुक्तांसह तत्कालीन नगररचनाकार राम चारठाणकर यांनी मंजुरी दिलेल्या रेखांकन (लेआऊट),
बांधकाम परवाना याची चौकशी करावी, अशी मागणी शेख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली होती. त्यांनी दखल घेत पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग परिक्षेत्र नाशिक यांना चौकशी करण्याबाबत कळवले.
त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक यांनी लोखंडे यांना १२ ऑगस्टला गोपनीय आदेश करून गुन्हा तपासाच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
जावळे आणि खासगी एजंट
जावळे यांनी ग्रीन बेल्टमध्ये आरक्षित जागांवर रेखांकनाची परवानगी दिल्याचा आरोप आहे. बांधकाम व्यावसायिकांशी आर्थिक बोलणीसाठी त्यांनी खासगी एजंट ठेवले होते. त्या एजंटमार्फत आलेली प्रकरणास तातडीने मान्यता देण्यात येत होती.
एजंटच्या मोबाईलचा सीडीआर काढून बांधकाम धारकांकडून कोणी कोणी लाच घेतली किवा मागितली आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.