अहमदनगरमधील ‘या’ गावात सरपंचावर कोयत्याने वर करत मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात थेट सरपंचावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये. रस्त्याचे मुरुमीकरण करताना झालेल्या काही किरकोळ कारणातून हा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय.

Ahmednagarlive24 office
Published:
sarapanch

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात थेट सरपंचावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये. रस्त्याचे मुरुमीकरण करताना झालेल्या काही किरकोळ कारणातून हा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय.

ही घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात शनिवारी (दि.२०) दुपारी घडली. अय्याज शौकत शेख असे या हल्लेखोराचे नाव आहे. त्याच्यावर आर्म अॅक्टसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

घोसपुरीचे सरपंच किरण साळवे असे हल्ला झालेल्या सरपंचाचे नाव आहे. त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यांनी म्हटलंय की, चिखल होऊ नये यासाठी रस्त्याचे मुरुमीकरण सुरु असून शनिवारी (दि. २०) दुपारी ३ वाजता सरपंच किरण साळवे,

उपसरपंच विठ्ठल हंडोरे व ग्रामपंचायत सदस्य हे काम कसे चालले आहे याची पाहणी करत होते. त्या वेळी आरोपी अय्याज शेख तेथे मोटरसायकलवर आला. त्याने सरपंच साळवे यांना जातिवाचक शिवीगाळ करत तुला सांगितले ना घरासमोर मुरूम टाकू नको,

तू जातीच्या जीवावर लय माजला काय, थांब तुझा माज जिरवतो, असे म्हणत घरातून धारदार कोयता आणून सरपंच साळवे यांच्यावर वार केला. मात्र, त्या वेळी सरपंच साळवे मागे सरकल्याने ते थोडक्यात बचावले. त्यानंतर त्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला,

मात्र त्याच्या आईने त्याच्या अंगावर उडी मारली व त्याचा वार हुकवला. त्यानंतर त्याने सरपंच साळवे, तसेच उपसरपंच विठ्ठल हंडोरे यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत सरपंच साळवे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe