Ahmednagar News : लावणी क्वीन गौतमी पाटील हिच्यावर नगरमधील एका प्रकरणाशी संबंधित एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हाच्या प्रकरणांमध्ये काल सोमवारी ती नगरच्या न्यायालयामध्ये हजर झाली होती.
यावेळी ती वेशभूषा बदलून न्यायालयाच्या आवारात आली होती. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अटी शर्तीवर गौतमी पाटीलला जामीन मंजूर केला.
मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांनी विनापरवानगी कार्यक्रम घेत नियमांचे उल्लंघन केले होते.
या संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने अटी आणि शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे.
तिच्या कार्यक्रमाला काही तरुणांकडून हुल्लडबाजी होण्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला गालबोट लागलेलं बघायला मिळालं होतं. एकदा तर तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली की काही जण जिल्हा परिषद शाळेच्या कौलांवर जावून कार्यक्रम पाहत होते.
यावेळी एक जण कौलावरुन थेट जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळेला पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली होती
तरीही आयोजकांनी कार्यक्रम घेतला या प्रकरणासंदर्भामध्ये येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये आयोजकांसह गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणं अनिवार्य आहे.
अन्यथा कोर्टाकडून वॉरंटदेखील निघू शकते. पण तसे काही घडले नाही. त्याआधीच गौतमी आज कोर्टात हजर झाली. न्यायमूर्तीनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तीच्या आधारावर जामीन मंजूर केला.