शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! कांद्यावरही मिळणार तारण कर्ज, जाणून घ्या सविस्तर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता एक महत्वाची बातमी आली आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत कांद्याला मालतारण सुविधा उपलब्ध नव्हती.

onion

Ahmednagar News  :  कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता एक महत्वाची बातमी आली आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत कांद्याला मालतारण सुविधा उपलब्ध नव्हती.

मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची सुविधा नाही, तो कांदा महाकिसान संघ वेअर हाऊस (चाळी) मध्ये ठेवून त्यावर शेतकऱ्यांना बँकांकडून कांदा मालतारण सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याबाबत महाकिसान संघ नोडल एजन्सीचे चेअरमन प्रशांत लोखंडे यांनी माहिती दिली. श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली. हमीभाव खरेदीमध्ये शेतकऱ्यांची होणारी ओढाताण कमी करण्यासाठी महाकिसान संघाने स्वतःचे पोर्टल आणि अॅप विकसित केले आहे.

आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होते. मात्र, कांदा काढल्यानंतर लगेच त्याला योग्य तो दर मिळत नाही. म्हणून शेतकरी आपल्या छोट्या-मोठ्या चाळीत कांद्याची साठवणूक करतो. मात्र, जास्त उत्पादन झाल्याने तयार केलेली चाळ पुरत नाही.

तसेच शेतकऱ्यांचे खताचे, बियाणाचे असे छोटे-मोठे देणे असल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना तो कांदा कवडीमोल भावामध्ये विकावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान आता टळणार आहे.

कांदा तारण सुविधा प्रथमच मिळणार
यापूर्वी गहू, ज्वारी, सोयाबीन, हरभरा व इतर धान्य गोदामामध्ये साठवून शेतमाल तारण योजनेअंतर्गत कर्ज मिळत होते. मात्र कांदा साठवून कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. आता मात्र लोखंडे यांची ही योजना यशस्वी झाली,

तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा पिकवला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe