सुटकेचा निश्वास ! ‘समन्यायी’ची टांगती तलवार हटली, जायकवाडीत किती झाला पाणीसाठा? कशी आहे स्थिती? पहा..

मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून ५५ टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाला आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
jaykwadi

Ahmednagar News : मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून ५५ टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाला आहे.

त्यामुळे आता या विराट अशा जकवाडी धरणात तब्बल ६५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता ‘समन्यायी’ची टांगती तलवार हटली असून नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा यांच्यात होणाऱ्या संघर्ष या वर्षी होणार नाही

हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांत देखील आनंदाचे वातावरण आहे.

जायकवाडीचा किती झाला पाणीसाठा ?
गोदावरी खोन्याच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुळा-प्रवरा आणि गोदावरी या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी जायकवाडी धरणात जमा होत आहे.

या धरणात बुधवारअखेर ७८.११ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तो क्षमतेच्या सुमारे ६७.९० टक्के आहे. त्यात जिवंत साठा ५२.०५ टीएमसी आहे.

त्यामुळे समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार आयकवाडीत पुरेसे पाणी झाल्याने आता नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडावे लागणार नाही.

धरण भरण्याची शक्यता
जायकवाडी धरणाची क्षमता १०२.७२ टीएमसी आहे. ७८.११ टीएमसी पाणी (६७.९० टके) जमा झाले असून जिवंत साठा ५२.०५ टीएमसी आहे. अजूनही सुमारे ५६ हजार क्यूसेक आवक धरणात सुरू असल्याने साठा मोठ्या प्रमाणात वाढण्याची खात्री निर्माण झाली आहे.

किंबहुना जायकवाडी धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा सर्वांना आहे. तसे झालेच, तर मराठवाडयाचा पिण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न किमान दोन वर्षांसाठी तरी मार्गी लागेल असे मानले जात आहे.

किमान यंदा तरी पाण्यासाठीचा नगर-नाशिक आणि मराठवाडा असा नेहमीचा संघर्ष यंदा मिटला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe