भाऊ रिटर्न्स ! बाजारसमितीच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी, भानुदास कोतकर यांनी शेतकरी व कांद्याबाबत दिला ‘हा’ सज्जड इशारा

नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारचे गुरुवारी (दि. १५) भानुदास कोतकर उपबाजार समिती असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर नगरच्या विविध क्षेत्रात भानुदास कोतकर यांची चर्चा व्हायला सुरवात झाली.

Ahmednagar News :  नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारचे गुरुवारी (दि. १५) भानुदास कोतकर उपबाजार समिती असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर नगरच्या विविध क्षेत्रात भानुदास कोतकर यांची चर्चा व्हायला सुरवात झाली.

दरम्यान भानुदास कोतकर यांची शेतकऱ्यांप्रती असणारी आपुलकी ही सर्वश्रुत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल या दृष्टीने त्यांनी नेप्ती उपबाजार समिती अवघ्या ११ महिन्यात उभी केली.

शेतकऱ्यांचा कांदा नगरमध्येच येऊन व्यापारी घेऊ लागले. दरम्यान आता याच उप बाजार समितीस भानुदास एकनाथ कोतकर असे नाव देण्यात आले. दरम्यान यावेळी देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली.

नेमके काय म्हणाले कोतकर
अहमदनगर बाजार समितीचे संचालक होण्यासाठी मोठी लाइन लागते पण शेतकऱ्यांचे आर्थिक हित पाहण्यासाठी कोणी पुढे येत नाही. बाजार समितीच्या दुर्लक्षाने नगरचा कांदा विक्रीसाठी पुण्या-नाशिकच्या बाजार समितीत जातो.

याचे कारण शोधा आणि गांभीर्याने घ्या, नगर बाजार समितीत ३ लाख गोणी कांदा विक्रीला आला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला नगर बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. कोतकर यांनी सांगितले की, मी सहकाऱ्यांना सोबत घेऊन फक्त ११ महिन्यांत नेप्ती उपबाजार समिती उभी केली.

ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे. त्यांच्याच हिताचे निर्णय येथे घेतले पाहिजे.  लवकरच नेप्ती उपबाजारचा सात एकर जागेत विस्तार करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.

..तर कांद्यामुळे माझा वांधा झाला नसता
माझ्या हस्ते कांदा भाव फलकाचे अनावरण झाले. त्यात कांदा ३८ रुपये किलो दिसला. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर असा भाव असता तर कांद्यामुळे माझा वांधा झाला नसता, अशी मिश्किल टिपण्णी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमादरम्यान केली.

संग्राम जगताप, अक्षय कर्डीले, उदयनराजे कोतकर यांचीही यावेळी भाषण झाले. बाजार समितीचे उपसभापती रंभाजी सूळ यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सभापती भाऊसाहेब बोठे यांनी, तर माजी सभापती हरिभाऊ कर्डीले यांनी आभार मानले.

यावेळी माजी सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, सुवर्णा कोतकर, चंद्रकांत गाडे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe