Ahmednagar News : शालेय शिक्षण घेणारी मुलगी..आईवडील लोकांच्या शेतात काबाडकष्ट करणारे..’ती’गर्भवती राहिली.. कालांतराने प्रसूती झाली.. नंतर झाला भांडाफोड.. झालेल्या अत्याचाराला फुटली वाचा..
ही घटना घडली संगमनेर तालुक्यात. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका विवाहित तरुणाने मारून टाकण्याची धमकी दिली, त्याने तिच्यावर तीन-चार वेळा जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले.

२०२३ मध्ये नोव्हेंबर महिन्यातील ही घटना आहे. दरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली, २१ जून २०२४ ला तिची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे (वय ३६, रा. तळेगाव दिघे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
अल्पवयीन मुलगी तालुक्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहे. ती शालेय शिक्षण घेते. २०२३ नोव्हेंबर महिन्यात ती तिच्या आई-वडिलांसमवेत लोकांच्या शेतात कुट्टी करण्यासाठी गेली होती.
मका कापणे, ती जमा करणे आदी कामे ती करायची. बोडखे याची पत्नी सुद्धा कामाला यायची. त्यांचे भांडण झाले की, ती दोन-चार दिवस माहेरी निघून जायची. एकदा मुलीचे आई-वडील सोबत आले नव्हते, त्यावेळी रात्री ११ वाजता काम झाल्यानंतर बोडखे हा तिला त्याच्या घरी चल म्हणाला.
मुलगी त्याच्यावर ओरडली. घरी सोबत न आल्यास त्याने तिला मारून टाकण्याची धमकी दिली. मुलगी घाबरून त्याच्या घरी गेली. तेव्हा त्याची बायको माहेरी गेली होती. त्याने मुलीवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले.
कुणाला काहीं सांगितल्यास आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. धमकी देऊन त्याने तीन-चार वेळा मुलीला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले असल्याची माहिती समजली आहे.