नगर जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकर प्रकरणी रुग्णालयच नव्हे तर आता ‘या’ चार विभागाचा मागितला अहवाल, तेथेही गफला? पहा..

बहुचर्चित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातील विविध प्रमाणपत्रांची नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून अहवाल मागवले आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
POOJA KHEDKAR

Ahmednagar News : बहुचर्चित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातील विविध प्रमाणपत्रांची नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून अहवाल मागवले आहेत.

याबाबतची माहिती मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) सूचनेनुसार ही चौकशी केली जात असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांच्यावतीने सांगण्यात आले. यासंदर्भातील अहवाल आज (बुधवारी) विभागीय आयुक्तांना (नाशिक) सादर होणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध यंत्रणा आणि विभागाच्यावतीने मागवण्यात आलेली माहिती कशा स्वरूपाची राहणार याबाबत अधिक तपाशील देण्यास प्रशासनाकडून नकार देण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आलेल्या आहेत. स

ध्या त्या वाशिम जिल्ह्यात नियुक्त आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी संपत्ती 40 कोटींपेक्षा अधिक असताना नॉन क्रिमीलेअर गटातून मिळवलेले प्रमाणपत्र, दिव्यांग म्हणून मिळवलेले प्रमाणपत्र, वडिलांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासमवेत सादर केलेले मालमत्ता विषयक विवरणपत्र अशा अनेक गोष्टींमुळे खेडकर चर्चेत आल्या आहेत.

याशिवाय पुण्यामध्ये नियुक्त असताना त्यांनी केलेल्या विविध मागण्या, त्यांची आई मनोरामा यांच्यावर झालेली व प्रस्तावित असलेली कायदेशीर कारवाई, याचाही त्यामध्ये समावेश आहे. खेडकर कुटुंबीय मूळचे पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय शाखेतील प्रवेश, भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी लागणारी प्रमाणपत्रे नगरमधून मिळवली आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सालीमठ यांना अहवाल पाठवण्यास सांगितले गेले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हा शल्यशिक्षक डॉ. संजय घोगरे, तत्कालीन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दर्शना धोंडे या अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. प्राप्तिकर विभागाकडून कुटुंबाच्या संपत्तीक विवरणाची माहिती मागवली आहे.

नॉन क्रिमीलेयरचे प्रमाणपत्र दिल्याने पाथर्डी उपविभागीय महसूल अधिकार्‍यांकडून अहवाल घेतला, तसेच पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे विभागीय आयुक्त पदावरुन निवृत्त झालेले असल्याने मंडळाकडूनही त्यांनी माहिती मागवली आहे. काही अहवाल प्राप्त झाले आहेत,

काही लवकरच मिळतील, संबंधित विभागांना तातडीने अहवाल व कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.यांनी स्पष्ट केले. नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातून पूजा खेडकर यांना 2018 मध्ये नेत्रदिव्यांग व 2020 मध्ये मनोविकार असे दोन प्रमाणपत्र तसेच 2021 मध्ये डोळे व मनोविकार

असे दोन्हीचे मिळून एक प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचे प्रमाण 51 टक्के असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांनी सांगितले. यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe