नगर जिल्हा रुग्णालयातील आयएएस पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांत छेडछाडीचा धोका? नेमके काय घडले?पहा..

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून नगर मतदारसंघात उमेदवारी केलेल्या दिलीप खेडकर यांची कन्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्रकरण राज्यात चर्चेत आले आहे.

Published on -

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून नगर मतदारसंघात उमेदवारी केलेल्या दिलीप खेडकर यांची कन्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्रकरण राज्यात चर्चेत आले आहे.

नगरच्या जिल्हा रुग्णालयातूनच त्यांना नेत्र दिव्यांगत्व आणि त्यानंतर मानसिक आजाराचे असे संयुक्त प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे. दरम्यान आता या घोटाळ्यात सहभागी असलेले अधिकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्डरूम सील करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. पूजा खेडकर यांना २०१८ मध्ये नेत्रदोष, तर २०२० मध्ये मानसिक आजारी असल्याचे दोन वेगवेगळे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.

तशी नोंद रेकॉर्ड रूममधील रजिस्टरमध्ये सापडली आहे. हे सर्व अभिलेख जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्डरूममध्ये ठेवण्यात आले आहेत. ही रेकॉर्डरूम सध्या जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे बदलेले नाहीत.

यातील काही अधिकारी या घोटाळ्यात सहभागी असण्याची शक्यता आहे. खेडकर यांच्यासह घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केले जाऊ शकतो. यामध्ये मुळ कागदपत्रांमध्ये फेरबदल केले जाण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्डरूम राज्य सरकारने ताब्यात घेऊन सील करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पूजा खेडकर यांना २०१८ मध्ये नेत्र दिव्यांगत्व तर २०२० मध्ये मानसिक आजाराचे प्रमाणपत्र दिल्याचे आढळले. या दोन्हींचे एकत्रित प्रमाणपत्र २०२१ मध्ये त्यांना देण्यात आल्याची माहितीही प्रशासनाकडून पुढे आली आहे. त्यासाठी तत्कालीन वैद्यकीय मंडळाने तपासणी केली होती, हेही सांगितले गेले.

मात्र एकाच व्यक्तीला नेत्र आणि मानसिक आजाराचे दिलेले प्रमाणपत्र, पहिले प्रमाणपत्र रद्द न करता दिलेले दुसरे प्रमाणपत्र, यातून जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि संबंधित समितीकडे संशयाने पाहिले जात आहे.

दरम्यान, पाथर्डी विभागीय कार्यालयाकडून त्यांच्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचीही पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe