खा. निलेश लंकेंचे आरोग्य धोक्यात, आ. थोरातांची घटनास्थळी धाव.. अन ‘अशा’ पद्धतीने उपोषण सुटले.. पहा काय घडले..

खा. निलेश लंके हे मागील तीन ते चार दिवसांपासून अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करत होते. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती. परंतु याला अपेक्षित यश येताना दिसत नव्हते.

Ahmednagarlive24 office
Updated:
LANKE

Ahmednagar News : खा. निलेश लंके हे मागील तीन ते चार दिवसांपासून अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करत होते. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती.

परंतु याला अपेक्षित यश येताना दिसत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले. दरम्यान आज (दि.२५) त्यांची प्रकृती ढासळली होती. डॉक्टर कावरे हे घटनास्थळी आले होते. त्यांनी त्यांचे चेकअप केले. त्यानंतर कावरे यांनी सांगितले की, त्यांचे पल्स हे वाढलेले आहेत.

त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. तसेच त्यांच्या लघवीमध्ये कीटोन आढळल्याने किडनीला सूज असल्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले होते.

आ. थोरातांची शिष्टाई सफल..
दरम्यान आज आ. बाळासाहेब थोरात हे आंदोलनस्थळी आले होते. त्यांनी याठिकाणी येत उपोषणकर्ते खा. निलेश लंके यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी, उच्चाधिकारी यांच्याशी संवाद साधला.

खा. नीलेश लंके यांच्या तक्रारींची १५ दिवसात निःपक्ष चौकशी करू अशी ग्वाही यावेळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली. तसेच नाशिक विभागचे आयजी दत्ता कराळे यांच्याशी आ. बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला.

त्यांनी देखील चौकशी करून कार्यवाही करू असा शब्द दिला. नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिल्खेकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचेही यावेळी सांगितले.

आ. बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईला यश आले व त्यानंतर खा.निलेश लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले.त्यानंतर कार्यकर्त्यांनाही दिलासा मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe