सर्वांचे आले माझेच नाही आले..! आता काय? लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट समोर

:  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ३ हजार रूपये येऊ लागल्याने लाडक्या बहिणींमध्ये एकच उत्साह संचारला आहे. ज्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही, अशांनी कागदपत्र पूर्ततेसह बँक खाते व आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेसह सेवा केंद्रात एकच गर्दी केल्याचे चित्र दिसले.

Ahmednagar News  :  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ३ हजार रूपये येऊ लागल्याने लाडक्या बहिणींमध्ये एकच उत्साह संचारला आहे.

ज्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही, अशांनी कागदपत्र पूर्ततेसह बँक खाते व आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेसह सेवा केंद्रात एकच गर्दी केल्याचे चित्र दिसले. रक्षा बंधनपूर्वी बहिणींच्या बँक खात्यामध्ये ३ हजार रूपये जमा होतील, असे जाहीर केले होते.

दरम्यान, शनिवारपासून अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ३ हजार रूपये जमा झाल्याने लाभधारक लाडक्या बहिणींचा आनंद गगनात मावेना. परंतु अनेक महिला अशा आहेत की ज्यांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत.

त्यामुळे शेजारणींचे आले, मैत्रिणींचे आले पण माझेच आले नाहीत असा सूर लावत काही महिला नाराज झाल्यात. त्यामुळे हे पैसे का आले नाहीत ? हे पैसे येण्यासाठी काय करावे लागेल? हे आपण येथे जाणून घेऊयात.

पैसे का नाही आले?
पैसे न येण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसणे, त्यामुळे प्रथम अर्जदार महिलांना आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्गत अर्ज करताना बैंक खाते क्रमांक टाकून पासबुक अॅपलोड केले.

मात्र, हे बैंक खाते आधारशी लिंक नव्हते, तर अन्य बँक खाते आधारशी लिक होते. त्यामुळे पैसे त्या खात्यावर वर्ग झाल्याचे काही लाभार्थी महिलांनी सांगितले. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर आपले आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे हे तपासून घ्यावे.

काय करावे लागेल?
पैसे आले नाहीत हे करा बैंक खाते आधारशी लिंक आहे की, नाही हे तपासून पाहा. बँक खाते लिंक नसेल तर ते तातडीने करून घ्या. नारीशक्ती दूत अॅपवर अर्ज पेंडिंग आहे की, ऍप्रूव्ह आहे हे तपासा.

मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का, हे तपासा. मेजेस आला असेल तर तत्काळ त्रुटींची पूर्तता करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe