पाच झालते, सहावं लग्न करण्यासाठी आली.. मंडपात जाणकारांना काही गोष्टी लक्षात येताच भांडाफोड..

गेल्या काही दिवसापासून मुलींच्या संख्येत मोठी घट झाल्याने तरुणांचे हात पिवळे करणे आई, वडिलांसाठी मोठी तारेवरची कसरत ठरत आहे. बेरोजगार असणाऱ्या तरुणांचे देखील प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

Updated on -

Ahmednagar News : मागील काही दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात फसवणुकीच्या अनके घटना घडल्या आहेत. यामध्ये लग्नाळू मुलांची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. त्यातच आता नोकरी नसल्याने बेरोजगार असणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे.

आधी पाच लग्न होऊन संबंधितांना चुना लावलेल्या वधूसोबत विवाहबंधनात अडकण्याची तयारी सुरू असताना काहींना संबंधित वधू आणि तिच्या सोबत आलेल्या महिलांचा संशय आला. हा संशय बळावल्याने त्यांनी वधूसोबत आलेल्या महिलांची चौकशी केली. खोलात जाऊन झालेल्या चौकशीमुळे भेदरलेल्या वधूसह सोबत असणाऱ्या महिलांची बोबडी वळाली आणि सत्य समोर आले.

यामुळे लग्नाळू तरुणाच्या कुटुंबाची अडीच लाखांसह इज्जतही वाचली. हा प्रकार पाथर्डी तालुक्यातील   एका गावातील तरुणासोबत घडला. अखेरच्या क्षणी सर्व प्रकार समोर आल्याने संबंधित तरुणाच्या कुटुंबाने त्या वधूसह आलेल्या महिलांना सोडून दिले आणि झालेल्या प्रकारावर पदडा टाकला.

सध्या समाजात मुलींच्या संख्येत मोठी घट झाल्याने मुलांच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधणे पालकांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे. यात बेरोजगार तरुणांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामुळे तरुणांना लप्रासाठी वधू शोधण्यासाठी अटापिटा करावा लागत आहे. असाच एक फसवणूक होता होता वाचल्याचा प्रकार करंजी शेजारील गावातील कुटुंबासोबत घडला आहे. लग्नसाठी मुलीकडील व्यक्तींना अडीच लाख रुपये देऊन हा लग्न सोहळा पार पाडण्याचे नियोजन ठरले. नवरी मुलगी व तिच्यासोबत तीन ते चार महिला एका चार चाकी वाहनाने नवरदेवाच्या गावामध्ये दाखल झाले.

मुलगी एवढी मेकअप करून आली होती की तिने यापूर्वी पाच लग्न करून सहावं लग्न करण्यासाठी ती सज्ज झाली असल्याचे कोणालाही उमगले नाही. हा लग्नसोहळा वृद्धेश्वर परिसरात पार पडणार होता. त्या ठिकाणीच सर्व देणी-घेणी पार पडणार होती. त्यानुसार संबंधित ठिकाण लग्नासाठी सज्ज झाले. मात्र, यावेळी काही जाणकार व्यक्तींना नवरी मुलीसह तिच्यासोबत आलेल्या महिलांबद्दल संशय आला. यामुळे त्यांनी लग्न सोहळा पार पाडण्यापूर्वीच नवरी मुलीसह तिच्यासोबत आलेल्या महिलांची चौकशी सुरू केली.

यावेळी बोबडी वळालेल्या वधू आणि संबंधित महिलांना चोपून काढण्याची तयारी करताच, त्या नवरी मुलीसह सोबत आलेल्या महिला पोपटासारख्या बोलू लागल्या. आम्हा तिघींना प्रत्येकीला ५० हजार आणि नवरीला एक लाख मिळणार होते, असं तरुणांच्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या अडीच लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी नवरी संबंधित तरुणाला सोडून पळून जाणार होती. मात्र, आता लग्नापूर्वी गुपीत खुले केले आहे. आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका,

आमची सुटका करा, अशी विनवण्या केल्याने उपस्थितांनी लग्नापूर्वी सत्य समोर आले. तसेच अडीच लाख आणि वाचली आहे. यामुळे झाले गेले सोडून द्यायची भूमिका घेत संबंधित नवरी आणि तिच्या सोबत आलेल्या महिलांना सोडून दिले. दरम्यान, तालुक्यात अनेक लग्नाळूच्या बाबतीत असे प्रकार घडलेले आहेत.

अशा प्रकारे लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून प्रत्येक मुलाच्या आई-वडिलांनी सावध होण्याची गरज आहे. पाच नवऱ्या मुलांना चुना लावून सहावं लग्न करण्यासाठी तयार झालेल्या या नवरी मुलीच्या धाडसाची देखील कमालच म्हणावी लागेल, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News