Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना आता विद्यार्थिनीसंदर्भात एक खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थिनीला बळजबरीने लॉजवर नेऊन तिला मारहाण करण्यात आली. ही मुलगी श्रीरामपूर तालुक्यातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेते.
या विद्यार्थिनीला बळजबरीने लॉजवर नेऊन तिला मारहाण करण्यात आली. विद्यार्थिनीला दुचाकीवरून बाभळेश्वर येथे नेले.
याप्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून यवतमाळ जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव रोशन वसंतराव वाघ असे आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. २२ जुलै या दिवशी ही घटना घडली.
विद्यार्थिनी ही यवतमाळ जिल्ह्यातील आहे. तरुणाने विद्यार्थिनीला शहरातील एका लॉजवर नेले. तेथे तिला मारहाण केली. फोनवर संपर्क करीत नाही. तसेच संबंध ठेवता नाही, असे तरुणाचे म्हणणे होते.
गेल्या चार वर्षांपासून गावातील तरुणाशी या विद्यार्थिनीची ओळख झाली होती. नर्सिंग कोर्ससाठी श्रीरामपूरला आल्यानंतर तरुण विद्यार्थिनीशी संपर्क करीत होता. त्याने बळजबरीने दुचाकीवर बसवून नेले.
तिच्याकडील मोबाईल हिसकावून घेत बंद केला. विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी स्थानिक पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी रोशन याच्याशी संपर्क साधला. रात्री आठ वाजता शहर पोलिस ठाण्याच्या बाहेर विद्यार्थिनीला सोडून देण्यात आले.
यात्रेत आलेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार
२१ वर्षीय विद्यार्थीनी सप्टेंबर २०२३ मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे यात्रेनिमित्त आली होती. तेव्हा शिर्डी येथे बस स्थानकावर ओळख झालेला दिनेश बाळासाहेब जाधव, रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर याने विद्यार्थीनीस गोड बोलून तुझ्याशी लग्न करील, रात्र फार झाली आहे,
असे म्हणत घरी नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच दिनेशने या विद्यार्थीनीवर शिर्डीतील हॉटेलमध्येही नेवून अत्याचार करत अश्लिल फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली.
या प्रकरणी राहाता तालुक्यातील पीडित विद्यार्थीनीने श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी दिनेश बाळासाहेब जाधव याच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.