अहमदनगरमधील मुलींनो, महिलांनो तुम्हाला मिळतील पाच लाख रुपये, तेही बिनव्याजी

केंद्र सरकारच्या महिलांसाठी काही विशेष योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळते. या योजनेच नाव लखपती दीदी असे आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्य शिकवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.

Published on -

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या महिलांसाठी काही विशेष योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळते. या योजनेच नाव लखपती दीदी असे आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्य शिकवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.

मोदी सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासोबतच आर्थिक मदतदेखील केली जाते. या योजनेत महिलांना १ ते ५ लाख रुपये कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज लागत नाही.

या योजनेंतर्गत महिलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तसेच व्यवसाय कसा करायचा, याबाबत टीप्सदेखील दिल्या जातात. या योजनेत महिलांना आर्थिक टीप्स, मार्केटिंग प्लॅनबाबत माहिती दिली जाते. याचसोबत ऑनलाइन बँकिंगबाबत माहिती दिली जाते.

आतापर्यंत जवळपास ९ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे बचत गटांशी संबंधित महिलांना फायदा होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेमुळे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

कोण घेऊ शकते लाभ?
या योजनेसाठी महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १८ ते ५० वयोगटातील महिला, या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात भेट द्यावी लागेल.

प्रशिक्षण
योजनेत महिलांना आर्थिक साक्षरता वर्कशॉप, सेव्हिग इन्सेंटिव्ह, मायक्रोक्रेडिट सुविधा, स्किल डेव्लपमेंट आणि वोकेशनल ट्रेनिंग, व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेमुळे महिला स्वावलंबी व उद्योगशील बनतील. हाच उद्देश या योजनेचा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News