Ahmednagar News : सोने-चांदीच्या किमतीने काही दिवसांपूर्वी उच्च पातळी गाठली होती. सोने २४ कॅरेट जवळपास ७४ हजारांपर्यंत गेले होते. परंतु आता अहमदनगरसह सर्वच ठिकाणी सोन्याचे भाव कमी झाले आहेत.
याचे कारण म्हणजे अर्थसंकल्पामध्ये केलेली घोषणा. अर्थसंकल्पामध्ये सोने चांदीवर आकारण्यात येणाऱ्या आयात शुल्कमध्ये १५ टक्क्यावरून नऊ टक्के कमी करण्यात आला आहे.
त्यामुळे आता सोन्याच्या किमती कमी झाल्यात. या घोषणेनंतर सोने प्रति तोळा ३ हजार ५०० तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे ८ हजार रुपयांची घट झाली आहे.
अहमदनगरमध्ये २० कॅरेट सोन्याचे भाव ६१ हजार रुपयांवर आले आहेत. दरम्यान, सोन्या- चांदीच्या भाव कोसळल्याने नगर सराफ बाजारातील व्यवहारावर परिणाम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया / युक्रेन यांच्या दरम्यान होणाऱ्या संघर्षानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला.
त्यामधे सोने-चांदीवरील आकारण्यात येणारा पंधरा टक्के आयात शुल्कामधे ९ टक्के घट करून सहा टक्के केल्याने सोने-चांदीच्या भावात मोठी घट झाली. अर्थसंकल्पापूर्वी सराफ बाजारात सोने ७३ हजार रुपये तोळा तर चांदी ९३ हजार रुपये प्रती किलो होती.
परंतु आता हे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वधु-वर पक्षासह ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम झाला होता. आता ही खरेदी पुन्हा वाढेल असे दिसते.
सोने चांदीचे दर (जीएसटी व ठिकाणानुसार किमतीत थोडाफार बदल होऊ शकतो)
सोने
२४ कॅरेट ६९ हजार
२२ कॅरेट ६६ हजार
२० कॅरेट ६१ हजार
चांदी
८३.००० हजार रुपये किलो.