ग्रामपंचायत सदस्यच वाळू तस्कर? तलाठ्याचे वाहनही ठोकले.., अहमदनगरमधील घटना

valu taskari

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील आरडगाव परिसरात वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी यांच्या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन आरोपी ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याची घटना दि. १९ जून २०२४ रोजी घडली होती.

यातील आरोपी एक ग्रा.पं. सदस्य आहे. त्यास राहुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बाबासाहेब रामजी पंडीत, वय ४७ वर्षे, हे राहुरी येथे कामगार तलाठी म्हणून काम पाहतात. दि. १९ जून २०२४ रोजी रात्री ११.३० वाजे दरम्यान तहसीलदार नामदेव पाटील

यांच्या आदेशावरून बाबासाहेब पंडित व कोतवाल योगेश पुंजाहरी झुगे हे चारचाकी वाहनातून तालूक्यातील आरडगाव येथे चोरटी वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी त्यांना एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आरडगांव कडुन रोडने आल्याचे दिसले. तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने ट्रॅक्टर थांबवला नाही.

तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी चारचाकी वाहनातूनत्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. तेव्हा ट्रॅक्टर चालकाने तलाठी बाबासाहेब पंडित यांच्या चारचाकी वाहनाला धडक देऊन तो ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.

तलाठी बाबासाहेब रामजी पंडीत यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. दि.२० ऑगस्ट रोजी राहूरी स्टेशन रोड, नाका नं.५ येथे सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी बडे हे करत आहेत. दरम्यान हा वाळू चोरी करणारा ग्रामपंचायत सदस्य आहे अशी माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe