‘तो’ प्रसिद्ध कलाकार भंडारदऱ्यात घसरून पडला, मृतदेह बाहेर

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये असलेल्या लव्हाळवाडी येथील एका आदिवासी शेतकरी तरुणाचा भंडारदरा धरणामध्ये पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
budun mrutyu

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये असलेल्या लव्हाळवाडी येथील एका आदिवासी शेतकरी तरुणाचा भंडारदरा धरणामध्ये पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हा तरुण लव्हाळवाडीच्या आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या पथकातील प्रमुख कलाकार होता. अकोले तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या लव्हाळवाडी येथील ज्ञानेश्वर देऊ उघडे (वय-३८) या तरुणाचा भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये पाय घसरून पडल्याची घटना घडली

असून त्यातच त्याचा अंत झाला आहे. ज्ञानेश्वर हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास लव्हाळवाडीपासून जवळच असणाऱ्या साम्रद गावाकडे जाणाऱ्या केटी वेअरजवळील शेतामध्ये भाजी आणण्यासाठी गेला होता.

संध्याकाळ झाली तरी ज्ञानेश्वर घरी पोहोचला नाही, त्यामुळे त्याच्या घरच्या व्यक्तींनी त्याची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी केटी वेअरच्या जवळच पाण्यामध्ये ज्ञानेश्वरचे जर्किन आढळून आले. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह केटी वेअरच्या जवळच पाण्यावर तरंगताना आढळून आला.

या परिसरात प्रचंड हवा असल्याने ज्ञानेश्वरचा तोल गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश्वर हा अट्टल पोहणारा होता; मात्र गत दहा-बारा दिवसांपासून भंडारदऱ्याच्या परिसरात अतीमुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा मोठा लोंढा असतो.

ज्ञानेश्वर लव्हाळवाडीच्या आदिवासी नृत्य पथकातील एक उत्तम कलाकार होता. त्याच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजुर पोलिसांनी घटनास्थळावर जात पंचनामा केला असून राजूरच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविला आहे.

पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, कॉन्स्टेबल दिलीप डगळे, सचिन शिंदे, अशोक काळे, कैलास नेहे व इतर कर्मचारी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe