मुसळधार ! अहमदनगर-कल्याण महामार्ग 24 तासांपासून बंद, नदीच्या पुरात रस्ता वाहून गेला..

मुसळधार पावसाने अहमदनगर-कल्याण महामार्ग २४ तासांपासून बंद आहे. या महामार्गावरील वाहतूक २४ तासांपासून बंद ठेवण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 office
Updated:
ulhas nadi

Ahmednagar News : मागील दोन दिवसांपासून पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे.

तर काही भागात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या मुसळधार पावसाने अहमदनगर-कल्याण महामार्ग २४ तासांपासून बंद आहे. या महामार्गावरील वाहतूक २४ तासांपासून बंद ठेवण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने उल्हास नदीला मोठे पाणी आले आहे. त्यामुळे या नदीवरील रायता पुलावरून पाणी गेले. या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे. पुलावरून पाणी गेल्याने लोखंडी संरक्षक

जाळीसह रस्ता वाहून गेला असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे मागील २४ तासांपासून अहमदनगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक ठेवण्यात आली आहे.

अहमदनगरमध्येही धुमशान !
अकोले तालुक्यातील मुळा नदीचा उगम असणाऱ्या हरिशचंद्रगड या मुळाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत आहे.

त्यामुळे संगमनेर तालुक्यातील साकूरनजीक असणारा मांडवे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असून पारनेर संगमनेरचा संपर्क तुटण्याची भीती आहे. गेल्या बारा तासांपासून मुळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.

संततधार पावसामुळे व नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रात पाणी पातळी वाढत आहे.

राज्यातही कहर
बुधवारच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह कोकणाला अक्षरशः झोडपून काढले असून पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये हवामान विभागाने गुरुवारी रेड अलर्ट जाहीर केला होता.

तसेच शुक्रवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. संततधार पावसाने मुंबईकरांच्या मनात २००५ मध्ये २६ जुलैला झालेल्या पावसाची धास्ती निर्माण केली. पुणे, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित केले आहे. संपूर्ण राज्यातच पावसाचा कहर सुरू होता.

राज्यात पावसामुळे अनेक भागातील परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला.

रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या, तसेच सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe