अहमदनगरमध्ये दुसऱ्या दिवशीही मुसळधार ! ‘या’ दोन तालुक्यांत अतिवृष्टी, पहा जिल्ह्यातील आकडेवारी

मागील दोन तीन दिवसापासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवार (दि.16) रोजी नगर, कर्जत तालुक्यात अतिवृष्टी झाली असून 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
pavus

Ahmednagar News : मागील दोन तीन दिवसापासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवार (दि.16) रोजी नगर, कर्जत तालुक्यात अतिवृष्टी झाली असून 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तसेच व श्रीगोंदा व पाथर्डी, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे 67 मि.मी. पाऊस पडला. जिल्ह्यातील 97 महसूल मंडळापैकी 36 मंडलात दमदार पाऊस झाला असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी मध्ये दिसत आहे. खरीप हंगाम सलाईनवर असणार्‍या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे.

अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता आणि राहुरी तालुक्याला अत्यल्प पावसाची नोद झाली आहे. रविवार रात्री व सोमवार दिवसभर जिल्ह्यात पावसाची स्थिती होती. मोठ्या खंडानंतर सोमवारी दुपारीनंतर जिल्ह्याच्या अनेक भागात 2 ते 3 तास मध्यम स्वरूपाचा दमदार पाऊस झाला.

या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजारी, कपाशी, तूर, मका यासह चारा पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस होत होता.

मात्र, मोठ्या पावसाची शेतकर्‍यांना प्रतिक्षा होती. जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर असा मोठा पाऊस झालेला नाही. अपवाद वगळता झालेल्या दमदार आणि पेरणी लायक पावसावर शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. या पिकांना पावसाची मोठी प्रतिक्षा होती.

मात्र, सोमवारी झालेल्या पावासाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीत नगर तालुक्यातील नालेगाव 34.5, सावेडी 26, कापूरवाडी 43, केडगाव 101.5, भिंगार 40.5, नागापूर 37.3, जेऊर 31.8. चिचोंडी पाटील 58,

वाळकी 27, चास 52, रुईछत्तीसी 30. पारनेर तालुक्यातील भाळवणी 33.3, सुपा 11, वाडेगव्हाण 33, श्रीगोंदा 14, मांडवगण 25.8, बेलवंडी 32.3, कोळगाव 59.3, कर्जत 100.8, राशिन 39, भांबोरा 46, जामखेड 30.3, अरणगाव 19.8, खर्डा 49.3, नान्नज 30.8,

नायगाव 30, पाथर्डी तालुक्यात पाथर्डी 43, माणिकदौंडी 23, करंजी 39, मिरी 49.8, राहुरी तालुक्यातील वांबोरी मध्ये 67, राहुरी 30, सात्रळ 36, संगमनेर तालुक्यातील साकुर येथे 45 मिली मिटर पावसाचा यांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe