अहमदनगरमध्ये हिट अँड रण ! एक जागीच ठार, एक गंभीर

नगर पुणे महामार्गावरील राळेगण सिद्धी फाट्याजवळ चार चाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

Ahmednagarlive24 office
Published:
heat and run

Ahmednagar News : नगर पुणे महामार्गावरील राळेगण सिद्धी फाट्याजवळ चार चाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत डॉ. गोपाळ गुणवंत पवार (रा. जरडी ता. सोयागाव, जि. छत्रपती संभाजी नगर) यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. १९) रोजी मयत गणेश गुणवंत पवार व जखमी वाहन चालक राहुल लिंबाजी राठोड (दोघेही रा. जरडी ता.सोयागाव जि. छत्रपती संभाजीनगर) हे

गाडीने घरगुती सामान घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना सकाळी ५.३० याबाबत डॉ. गोपाळ गुणवंत पवार (रा. जरडी ता. सोयागाव, जि. छत्रपती संभाजी नगर) यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी (दि. १९) रोजी मयत गणेश गुणवंत पवार व जखमी वाहन चालक राहुल लिंबाजी राठोड (दोघेही रा. जरडी ता.सोयागाव जि. छत्रपती संभाजीनगर) हे गाडीने घरगुती सामान घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना सकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान राळेगण सिद्धी फाट्याजवळ गाडी पंक्चर झाली म्हणून थांबून पंक्चर काढत होते.

त्याच वेळी नगरकडून पुण्याच्या दिशेने जात असताना एका अज्ञात वाहनाने उभ्या वाहनाला व तेथील मयत गणेश पवार व जखमी राहुल राठोड यांना धडक दिली व पसार झाले. यात गणेश पवार जागीच मयत झाले व राहुल राठोड गंभीर जखमी झाले असे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल करून मयत व्यक्तीचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सुपा पोलिसांनी डॉ गोपाल पवार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वहान चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe