रात्री घरात घुसत पती व सासूला बेदम मारले, नंतर महिलेशी दुष्कृत्य केले..

अहमदनगर जिह्यातील गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत चालल्याचे चित्र आहे. आता जिल्ह्यातून दोन धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. एका घटनेत महिलेशी दुष्कृत्य तर दुसऱ्या घटनेत शस्त्राने वार व विटाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिह्यातील गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत चालल्याचे चित्र आहे. आता जिल्ह्यातून दोन धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. एका घटनेत महिलेशी दुष्कृत्य तर दुसऱ्या घटनेत शस्त्राने वार व विटाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पहिल्या घटनेत रात्रीच्या वेळी घरी येऊन पती व सासूला मारहाण करून महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात उंबरे येथील दोघांविरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण जेवण करून घरातील कामे करीत असताना दत्तात्रय ज्ञानदेव काळे, ईश्वर रघुनाथ ढोकणे दोघे रा. उंबरे हे घरी आले व महिलेला म्हणाले, तुझ्या नवरा व दीर कुठे आहे. त्यांना कामाला न्यायचे आहे.

असे विचारले असता महिला त्यांना ते बाहेर आहे असे सांगत असताना ईश्वर ढोकणे याने तिच्याशी लज्जा उपत्न होईल, असे वर्तन केले. त्यावेळी त्या महिलेचे पती व सासू हे आले. तेव्हा पती व सासू हे त्यांना समजून सांगत असताना त्याचा राग येऊन दत्तू काळे याने महिलेच्या पतीला हाताने तोंडात मारली तसेच सासूला धक्काबुक्की केली. तसेच माझ्या नादी लागला तर तुझा काटा काढतो अशी धमकी दिली.

भिंगार मध्ये तरुणावर धारदार शास्त्राने वार
मुलगा रात्रीच्यावेळी घरात डोकावत असल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणाला धारदार शस्त्र, लोखंडी गज, वीटाने मारहाण करून जखमी केले. देविदास कोंडीराम भोसले (रा. लक्ष्मीनगर, भिंगार) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

त्यांच्या पत्नी शालन देविदास भोसले (वय ३५ रा. लक्ष्मीनगर, भिंगार) यांनी याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल रमेश नन्नवरे, निरंजन उर्फ बाबू रमेश नन्नवरे व कमल रमेश नन्नवरे (सर्व रा. लक्ष्मीनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

२ जुलै रोजी सायंकाळी फिर्यादी शालन व त्यांचे पती देविदास यांनी संशयित आरोपींना तुमचा मुलगा रात्रीच्यावेळी आमच्या घरात का डोकावतो, असे विचारले असता आरोपींना त्याचा राग आला. त्यांनी शिवीगाळ,

धक्काबुक्की करून देविदास यांच्या डोक्यात लोखंडी गज, खांद्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. फिर्यादीची मुलगी सोडविण्यासाठी आली असता तिला देखील वीटाने मारहाण करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News