जगतापांची ३० लाखांची फसवणूक, कोतकरवर गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यातील फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. जमीन, जागा, प्लॉट आदी प्रकरणात फसवणूक मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा ३० लाखांचा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
fraud

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. जमीन, जागा, प्लॉट आदी प्रकरणात फसवणूक मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.

दरम्यान आता पुन्हा एकदा ३० लाखांचा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. घर नावावर करून देतो, असे अश्वासन देत बारामती येथील एकाची २९ लाख ९० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

केडगाव हनुमाननगर येथे जमिनीच्या व्यवहारापोटी ३० लाख रुपये घेऊन जमीन नावावर करून दिली नाही, या आरोपावरून सुनील धोंडिबा कोतकर, सुनीता सुनील कोतकर (रा. हनुमाननगर, अरणगाव) यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हा प्रकार मार्च ते एप्रिल २०२४ या दरम्यान घडला. रुपीचंद किसनराव जगताप (वय ३६, रा. चोपडच, ता. बारामती, जि. पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील धोंडीबा कोतकर, सुनीता सुनील कोतकर (रा.हनुमाननगर, केडगाव) यांच्याविराधात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

केडगाव येथे बांधलेले रो हाऊस तुमच्या नावावर करून देतो, असे असे अश्वासन देत फिर्यादीकडून आरोपीने २९ लाख ९० हजार रुपये घेतले.

परंतु, आरोपीने घर नावावर करून न देता फसवणूक केली. तक्रारदार यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऍड. ढाकणे यांचीही फसवणूक
नुकताच काही दिवसांपूर्वी जमीन प्रकरणात ऍड. ढाकणे यांचीही फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. नगर – वडगाव गुप्ता परिसरात असलेल्या शेतजमिनीत प्लॉट

पाडून परस्पर सुमारे ३३ जणांना खरेदीखत करून देत विक्री करून एकाने अॅड. प्रताप ढाकणे यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात श्रेणिक धरमचंद खाबिया (रा. सावेडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe