सावकाराच्या भावाने कर्जदारावर केले धारदार चाकूने सपासप वार, अहमदनगरमधील प्रकार

अहमदनगर जिल्ह्यामधील अवैध सावकारी हा अनेकदा चर्चेचा विषय झालेला आहे. यातून घडणाऱ्या अनेक घटनाही जिल्ह्यासाठी धक्कादायक असतात. आता सावकाराच्या चुलतभावाने कर्जदारावर वाहनाच्या चावीतील की-चैनमधील धारदार चाकूचे सपासप वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
chakuhalla

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामधील अवैध सावकारी हा अनेकदा चर्चेचा विषय झालेला आहे. यातून घडणाऱ्या अनेक घटनाही जिल्ह्यासाठी धक्कादायक असतात.

आता सावकाराच्या चुलतभावाने कर्जदारावर वाहनाच्या चावीतील की-चैनमधील धारदार चाकूचे सपासप वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार गमनेर तालुक्यात साकूरजवळ बिरेवाडी घडला आहे.

कर्जदाराने सहायक निबंधकांकडे तक्रार दाखल केल्याच्या रागातून गुरुवारी हा हल्ला झाला अशी माहिती मिळाली. मुक्ताराम काशिनाथ सागर असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

समजलेली अधिक माहिती अशी : फिर्यादीत म्हटले आहे, की गावात लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश हे अवैध सावकारीचा व्यवसाय करतात. सागर यांनी ढेंबरेकडून काही दिवसांपूर्वी एक लाख रुपये व्याजाने घेतले होते.

या रकमेचा आतापर्यंत तब्बल १२ लाख रुपयांचा परतावा केल्याचे आणि तसे पुरावे असल्याचे सागर यांचे म्हणणे आहे. व्याजाने रक्कम घेतवेळी २० गुंठे जमीन गहाणखत करण्याच्या नावाखाली ढेंबरे यांनी खरेदीखत करून घेतली आहे. आणखी काही वाढीव रकमेसाठी ढेंबरे शिवीगाळ, मारहाण करीत सागर यांना पैशाचा तगादा करीत होते.

शेवटी त्रासाला कंटाळून सागर यांनी संगमनेरातील उपनिबंधक कार्यालयात तक्रार केली होती. हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. मात्र ही तक्रार केल्याचा राग मनात ठेवून ढेंबरे यांनी भ्याड हल्ला केल्याचे सागर यांनी सांगितले.

गुरुवारी (दि. १८) सकाळी साडेनऊच्या सुमारास बिरेवाडीतील सोसायटीसमोर सागर व सावकाराचा चुलतभाऊ पंढरीनाथ पांडुरंग ढेंबरे यांच्यात यावरून बाचाबाची झाली. या वेळी नागरिकांनी भांडण मिटविले.

यानंतर सागर मोटारसायकलवरून घरी जात असताना पाठीमागून मोटारसायकलवरुन पंढरीनाथ ढेंबरे त्यांचा पाठलाग करीत आला. चावीच्या की-चैनचा चाकू सागर यांच्या डोळ्याच्या वर मारून गंभीर जखमी केले. दरम्यान, तक्रार मागे न घेतल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना ठार मारीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe