Ahmednagar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार असून आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात वर्ग झालेत.
ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरले आहेत त्यांना आता ३१ ऑगस्टला पैसे मिळणार असल्याची माहिती समजली आहे. अहमदनगर जिल्ह्याचा विचहर केला तर मागील आठवड्यात ३१ जुलैपर्यंत अर्ज केलेल्या ६ लाख ९० हजार महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात ७ लाख १८ हजार महिलांचे अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जाची आठ दिवसांत तपासणी होऊन ६ लाख ९० हजार महिला पात्र ठरल्या होत्या.
१५ ते २० ऑगस्टदरम्यान या महिलांच्या खात्यावर तीन हजार जमा झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३ लाख २५ हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाइन प्राप्त झाले आहेत.
यापैकी २ लाख ८५ हजार अर्ज तपासणीदरम्यान पात्र ठरले आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात २५ ऑगस्टअखेर ९ लाख ७५ हजार महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत
६ लाख ९० हजार महिलांच्या खात्यात पैसे
३१ जुलैपर्यंत अर्ज केलेल्या ६ लाख ९० हजार महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये वर्ग करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.
एक लाख एकवीस हजार महिलांचे खाते संलग्न नव्हते
जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात सात लाख आठरा हजार महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते.
त्यापैकी एक लाख एकवीस हजार महिलांचे खाते आधारशी लिंक आढळून आले नव्हते. अशा अर्जदारांना मेसेज पाठवून आधार लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
डीपीडीसीतील १ टक्का निधी राखीव
तालुका/वॉर्ड/जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च भागविण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचा ३१ जानेवारी २०२२च्या शासन निर्णयानुसार
‘महिला व बाल सशक्तीकरण’ या योजनेसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीपैकी १ टक्का निधी ‘विशेष बाब’ म्हणून तसेच उर्वरित २ टक्के निधी संदर्भ क्रमांक १ मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा असा निर्णय झाल्याची माहिती आहे.