नगर-सोलापूर महामार्ग.. ९ दरोडेखोर अन ‘तो’ व्यावसायिक.. भरदिवसा थरार..

नगर-सोलापूर महामार्गालगतचे गाव.. ९ दरोडेखोरांची टोळी.. भर दुपारी चार ची वेळ... 'तो' व्यावसायिक व त्याचा मित्र.. अन रंगला लुटीचा थरार.. ही घटना घडली मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ४च्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील वाटेफळ (ता.नगर) शिवारात. रस्त्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यावसायिकाला व त्याच्या मित्राला ९ दरोडेखोरांच्या टोळीने मारहाण करत...

Published on -

Ahmednagar News : नगर-सोलापूर महामार्गालगतचे गाव.. ९ दरोडेखोरांची टोळी.. भर दुपारी चार ची वेळ… ‘तो’ व्यावसायिक व त्याचा मित्र.. अन रंगला लुटीचा थरार..

ही घटना घडली मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ४च्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील वाटेफळ (ता.नगर) शिवारात. रस्त्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यावसायिकाला व त्याच्या मित्राला ९ दरोडेखोरांच्या टोळीने मारहाण करत

त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा २ लाख ३१ हजारांचा ऐवज, तसेच परवाना असलेला पिस्तूल पळवून नेली. निखिल संजय अच्छा (वय ३४, रा. शिक्षक कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर, जि. पुणे) असे फिर्यादीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी : अच्छा यांचा गोळ्या बिस्किटे होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायानिमित्त ते मंगळवारी दुपारी वाटेफळजवळच असलेल्या बीड जिल्हा हद्दीतील काही गावांत गेले होते.

तेथून परतताना वाटेफळ शिवारात रस्त्याकडेला चारचाकी गाडी उभी करून लघुशंकेसाठी थांबले होते. त्या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे मित्र अरुण मधुकर कानडे होते. हे दोघे गाडीतून खाली उतरल्यावर जवळच असलेल्या शेतातून ९ दरोडेखोरांची टोळी आली.

त्यांनी दोघांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच त्यांना धमकावत त्यांच्याजवळील सोन्याच्या अंगठ्या, चेन, रोख रक्कम असा २ लाख ३१ हजारांचा ऐवज, तसेच त्यांच्याजवळ परवाना असलेला पिस्तूल पळवून नेला. या घटनेने घाबरलेल्या फिर्यादींनी तातडीने शिरूरला जाऊन पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला.

ही घटना नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने शिरूर पोलिसांनी त्यांना नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी निखिल अच्छा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ९ दरोडेखोरांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते व पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग यांनी फिर्यादी व पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिल्यानंतर

ही घटना बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगर तालुका पोलिसांनी हा गुन्हा तपासासाठी अंभोरा पोलिसांकडे वर्ग केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe