नगर अर्बन बँकेच्या कर्जदारांनो सावधान ! मोठी धक्कादायक बातमी आली

नगर शहरातील नगर अर्बन बँक बोगस कर्ज वाटप प्रकरणामुळे अडचणीत आली. या बँकेला तब्बल 119 वर्षांची परंपरा आहे. एकीकडे बोगस कर्ज वाटप व दुसरीकडे वसुलीच नाही त्यामुळे ही बँक अगदी रसातळाला गेली.

Ahmednagarlive24 office
Published:
urban

Ahmednagar News : नगर शहरातील नगर अर्बन बँक बोगस कर्ज वाटप प्रकरणामुळे अडचणीत आली. या बँकेला तब्बल 119 वर्षांची परंपरा आहे. एकीकडे बोगस कर्ज वाटप व दुसरीकडे वसुलीच नाही त्यामुळे ही बँक अगदी रसातळाला गेली.

या बँकेचा परवाना देखील रद्द झाले आहे. दरम्यान आता ही बँक वाचवण्याची बँक बचाव समिती धडपड करत असून आवसायक गणेश गायकवाड यांच्या आदेशाने कर्ज वसुली सुरू करण्यात आली आहे.

मागील आठ ते दहा वर्षांपासून पैसे न भरणाऱ्या थकीत कर्जदारांनी बँकेने घेतलेल्या कट्टर भूमिकेमुळे पैसे भरण्यास तयारी दर्शवल्याचे चित्र आहे. सध्या अर्बन बँकेचे कर्मचारी कर्जदारांच्या घरांसमोर जात आहेत आणि ढोल ताशाच्या गजरात कर्ज वसुलीची मागणी करतायेत.

नगर अर्बन बँक वसुली पथक असे लिहिलेल्या पांढऱ्या गांधी टोप्या घालून बँकेचे वसुली पथक कर्जदारांच्या दारात जाऊन मागणी करत आहेत. ढोल ताशांचा आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनाही हे सगळे समजत असल्याने अनेकांनी याची धास्ती घेतली असल्याचे दिसते

व त्याचा परिणाम म्हणून अनेक कर्जदार स्वतःहून पैसे भरण्याची तयारी दाखवत असल्याची माहिती बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी दिली. राजेंद्र गांधी यांनी म्हटले आहे की, कुवत नसणाऱ्या कर्जदारालाही तत्कालीन अध्यक्षांसह संचालकांनी कर्ज दिले आहे.

त्यामुळे आता कर्जदार एक पैसाही भरू शकत नसल्याचे चित्र आहे. तसेच एखाद्या कर्जदाराच्या नावाचे कर्ज दुसऱ्याच कोणत्यातरी संचालकाच्या खात्यात वर्ग झाल्याच्या काही धक्कादायक गोष्टीही फॉरेन्सिक ऑडिटमध्ये नमूद करण्यात आल्याचे ते म्हणाले.

असे जे संचालक व काही ठराविक कर्जदार आहेत ते सध्या फरार असून त्यातील काही नगर शहरात भूमिगत झालेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe