Ahmednagar News : पाणी टंचाई, पाण्याचे दुर्भिक्ष्य आदी गोष्टीची अहमदनगर जिह्यातील काही तालुक्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या. आता या पाणीटंचाईमुळे नेवासेमधील जनता त्रस्त झाली आहे. आता नागरिकांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराच दिला आहे.
नागरिक म्हणतात, मागील दोन वर्षांपासून पिण्याचे पाणी १० ते १५ दिवसांतून येत आहे. याबाबत अनेकवेळा निवेदन देऊन देखील कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने आता नगरपंचायत मुख्य अधिकाऱ्यास घेराव घालून तोंडाला काळे फासण्यात येईल व नगरपंचायतीस कुलूप लावण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे.

पाणी प्रश्न सुटला नाही तर शेवटचा उपाय म्हणून प्रसंगी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे देखील नागरिकांनी सांगितले. नेवासे नगरपंचायतीचे प्रशासक असलेले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यात म्हटले आहे की, ५, ६, ७ या प्रभागांची लोकसंख्या सुमारे ४ ते ५ हजार आहे. आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. लवकरात लवकरात हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा नगरपंचायत मुख्य अधिकाऱ्यास घेराव घालून तोंडला काळे फासण्यात येईल व नगरपंचायतीस कुलूप लावण्यात येईल याची दखल गांभीर्याने घेऊन पिण्याच्या पाण्याला प्रश्न मार्गी लावावा, असे म्हटले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर परिसरातील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत. नेवासे तालुक्यासह अनेक गावे आहेत की जी पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त आहेत. अनेक भागात सध्या चारा टंचाई देखील निर्माण झाली आहे. यावर सध्या प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी देखील उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.