नगरमध्ये सलूनमध्येही अश्लील चाळे ! पुरुष स्त्री एकत्र येतात आणि…

नगर शहरात मागील काही दिवसांत अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. आता थेट सलून व स्पा सेंटरमध्ये अश्लील चाळे सुरु असल्याची धक्कादायक घटना पोलिसांच्या छाप्यानंतर उघडकीस आली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
crime

Ahmednagar News : नगर शहरात मागील काही दिवसांत अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. आता थेट सलून व स्पा सेंटरमध्ये अश्लील चाळे सुरु असल्याची धक्कादायक घटना पोलिसांच्या छाप्यानंतर उघडकीस आली आहे.

शुक्रवारी व शनिवारी पोलिसांनी नगर शहर, सावेडी, दिल्लीगेट आदी परिसरात मोठी कारवाई केली. पाईपलाइन रस्त्यावरील श्रध्दा एनक्लेव्ह नावाच्या इमारतीत निर्वाना फॅमिली सलोन अॅण्ड स्पा नावाचे सलोनमध्ये

पुरूष व महिलांना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचा प्रकार छाप्यातून समोर आला आहे. त्याचप्रमाणे सावेडी येथे
कॅफे शॉपच्या नावाखाली मुला- मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा दिली जात असल्याचेही समोर आले.

अशा तीन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी व शनिवारी कारवाई केली. अश्लिल चाळे करणाऱ्या मुला-मुलींना पकडून समज देऊन सोडून देण्यात आले तर कॅफे मालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कॅफे शॉपच्या नावाखाली मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रमाण सावेडी उपनगरात वाढले आहेत. अशा कॅफे शॉपचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकाला दिले होते.

कोकरे यांच्या आदेशाने पोलीस पथकाने शुक्रवारी सायंकाळी सावेडीतील ताठेनगर येथील गोल्ड स्टार कॅफेवर छापा टाकला. कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे रा. ताठेनगर, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. बालिकाश्रम रस्त्यावरील ऑरेंज कॅफेवर पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली.

या कॅफेचा मालक अविनाश विलास ताठे (वय ३० रा. ताठेनगर, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर दिल्लीगेट परिसरातील सायबर सिटीच्या पाठीमागे लाईफ लाईन कॅफेवरही पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली. या कॅफेचा मालक मंगेश गोरख कोळगे रा. चास रस्ता, अकोळनेर, ता नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

या तिन्ही कॅफेत मुले व मुली अश्लिल चाळे करताना मिळून आली होती. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. तसेच पाईपलाइन रस्त्यावरील श्रध्दा एनक्लेव्ह नावाच्या इमारतीत निर्वाना फॅमिली सलोन अॅण्ड स्पा नावाचे सलोनमध्ये पुरूष व महिलांना अश्लिल चाळे

करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचा प्रकार छाप्यातून समोर आला आहे. या सलोनचा मालक राहुल चंद्रकांत बागल (वय ३७ रा. ठाणे वेस्ट, हल्ली रा. पाईपलाइन रस्ता, एकविरा चौक, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe