बापरे ! अहमदनगरकरांचे सुरेश कुटेंच्या क्रेडिट सोसायटीत अडकलेत तब्बल ‘इतके’ कोटी, ठेवी मिळेनात, ठेवीदार हैराण

मागील काही दिवसांपासून ज्ञानराधा को-ऑप. क्रेडिट सोसायटी चर्चेत आहेत. पोलिसांनी सुरेश कुटे यांना पुण्यातून तब्यत घेत बीड मध्ये आणल्यानंतर ही सोसायटी आणखीनच चर्चेत आली. यामध्ये करोडोंच्या ठेवी अडकल्या आहेत.

Published on -

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून ज्ञानराधा को-ऑप. क्रेडिट सोसायटी चर्चेत आहेत. पोलिसांनी सुरेश कुटे यांना पुण्यातून तब्यत घेत बीड मध्ये आणल्यानंतर ही सोसायटी आणखीनच चर्चेत आली. यामध्ये करोडोंच्या ठेवी अडकल्या आहेत.

आता यामध्ये जामखेड शाखेत जामखेड शहरासह परिसरातील ६ हजार ५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या असल्याची माहिती समजली आहे. संस्था चालकांकडून नऊ महिन्यांपासून ठेवीदारांना ठेवी देण्याचे आश्वासन देत आहेत परंतु ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.

या ठेवीदारांनी खासदार नीलेश लंके, आमदार राम शिंदे, आमदार रोहित पवार, पोलिस निरीक्षकांना ठेवी मिळाव्यात यासाठी निवेदनाच्या माध्यमातून साकडे घातले आहे. बीड जिल्ह्यातील असलेली ज्ञानराधा को-ऑप. क्रेडिट सोसायटीची शाखा अनेक वर्षांपासून जामखेड शहरात आहे.

या संस्थेने ठेवीवर १२ टक्के व्याजदराने परतावा देण्याचे जाहीर केले होते. यामुळे जामखेड शहर, तालुका, जवळील आष्टी तालुक्यातील काही गावचे कष्टकरी, मजूर, कामगार, व्यापारी, डॉक्टर यांनी आयुष्याची पुंजी ठेव म्हणून या संस्थेत ठेवली. मागील दहा महिन्यांपूर्वी आयकर विभागाने

कुटे ग्रुपवर छापा मारल्यापासून ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी संस्थेत गर्दी केली; परंतु तुमचे पैसे देऊ, असे आश्वासन संस्था चालकांनी दिले. अनेकवेळा पैसे देण्यासाठी तारखा देऊनही पैसे मिळाले नाहीत, असे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

जामखेड येथील शाखा नऊ महिन्यांपासून बंद आहे. याबाबत ठेवीदारांनी आंदोलने केली. बीड येथील मुख्य शाखेत गेले; परंतु आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. घरातील मुला-मुलींचे लग्नकार्य, आरोग्य तक्रारी, यासाठी पैशाची गरज आहे. हक्काचे पैसे मिळण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ ठेवीदारांवर आली.

अखेर ठेवीदारांनी ठेवी मिळाव्यात यासाठी खासदार नीलेश लंके, आमदार राम शिंदे, आमदार रोहित पवार, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe