Ahmednagar News : एम आय एम अहमदनगर च्या वतीने सर्जेपुरा भागात शहरात जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी “कौमी एकता और भाईचारा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात एम आय एम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले की असे कार्यक्रम घेऊन जातीय सलोखा ठेवण्याची सर्व जाती धर्माच्या लोकांची जबाबदारी आहे. अहमदनगर कापड बाजार येथील सामान्य गरीब फेरीवाले या विषयावर त्यांनी भाष्य करतांना सांगितले की गरीब फेरी वाला जेव्हा दिवसभर आपला ठेला लाऊन बाजारात काही विकतो,

त्या नंतर त्याच्या घरी दोन पैशे येतात आणी त्याचा पर्पंच चालतो. जर त्यांना त्यांचे ठेला लावण्यापासून रोखले तर ते गरीब लोक उपाशी मारतील. त्यांनी प्रशासनाला विनंती केली की आपण लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लाऊन फेरीवाल्यांना नयाय द्यावे. सरकारच्या काही योजना आहेत ज्यामुळे फेरीवालांच्या पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
जर प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत असेल तर खासदार इम्तियाज जलील स्वत येईन गरीब फेरीवाले यांचा पुनर्वसन साठी, एम आय एम त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
या वर काही राजकीय लोकांनी प्रतिक्रिया दिली की खासदार इम्तियाज जलील यांना अहमदनगर शहरात येऊ देणार नाहीत.यावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की सध्या कोणताही व्यक्ती ज्याला त्यांच्या पक्षात नाव करायचा असेल
तर सोपा पर्याय म्हणजे एम आय एम पक्षावर आरोप करणे. इम्तियाज साहेबांनी गरीब फेरीवाल्यांचा पुनर्वसन करण्याचे प्रशासनाला सांगितले. त्यात गैर काय? ज्या लोकांनी इम्तियाज जलीलवर टीका केली
त्यांना गरीब फेरीवाल्यांचा पुनर्वसन होऊ नाहीत असे वाटते का? या लोकांच्या टिके मुळे असे वाटते कदाचित त्यांनी इम्तियाज जलील यांचे भाषण पूर्ण ऐकले नसावे किंवा त्यांना समजले नसावे. या लोकांनाच फक्त मोठे पैश्यावले व्यापारीवर प्रेम दिसते.
गरीब फेरीवाल्यांचा काय? त्यांचा परपंच कसे चालणार ? असा प्रश्न एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी उपस्थित केला. राहिल खासदार इम्तियाज जलील यांना येऊ देणार नाहीत ” तर त्यांना उत्तर देण्यासाठी एम आय एम चे कार्यकर्तेच भरपुर आहे “.
व्यापारी देखील आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. कोणतेही व्यापाऱ्याला एमआयएम कडून दुखावले जाऊ नये, अशा सूचना खासदार जलील यांनी दिलेल्या आहेत. ज्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केलेली नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.
परंतु व्यापार्यांच्या नावाखाली काही विघ्नसंतोषी संपूर्ण अहमदनगरच्या बाजारपेठेला पर्यायाने व्यापारी फेरीवाले यांना वेठीस धरत आहे, त्यांना मात्र एमआयएम धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
प्रशासन ने लवकरात लवकर गरीब फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गीलावावे त्याच बरोबर कापड बाजार येथील बेकायदेशीर बांधकाम व पक्के अतिक्रम हटवावे अन्यथा इम्तियाज जलील यांच्या आदेशाने आम्ही गरीब फेरीवाल्यांसाठी कायदेशीर लढा देऊ. त्याच बरोबर चुकीचे विधान करून अशांतता निर्माण करणाऱ्यावर प्रशासनाने कारवाई करावी असे डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.