पवार की डांगे ? नगर मनपाचे आयुक्त २४ तासात बदलले, बदली आदेशानंतर वेगळ्याच हालचाली, राजकारण की आणखी काही? पहा..

महापालिका आयुक्तपदी देविदास पवार यांची नियुक्ती झाल्याचे आदेश शासनाने जारी केल्यानंतर अवघ्या काही तासातच पुन्हा ट्विस्ट झाला. पवार यांची ऑर्डर रद्द करून यशवंत डांगे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. या हालचालींमुळे पवार आज नगरला रुजू होऊ शकले नसल्याचेही सांगण्यात येते.

Ahmednagarlive24 office
Published:
dange

Ahmednagar News : पंकज जावळे यांच्यावर झालेल्या लाच मागणीच्या आरोपानंतर महापालिका आयुक्तपदी कोण येणार याकडे लक्ष असतानाच देविदास पवार यांची नियुक्ती झाल्याचे आदेश शासनाने जारी झाले.

परंतु अवघ्या २४ तासात याच्यात ट्विस्ट आला पवार यांची ऑर्डर रद्द करून यशवंत डांगे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. या हालचालींमुळे पवार आज नगरला रुजू होऊ शकले नसल्याचेही सांगण्यात येते.

सोमवारी सायंकाळी शासनाने हा संभ्रम दूर करत नगर महापालिका आयुक्तपदी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश काढला. सोमवारी सायंकाळपासूनच पवार यांच्या आदेशाची प्रत सोशल मीडियावर फिरत होती.

आयुक्तपदावर कोणी नसल्याने महापालिकेतील बरीच कामे प्रलंबित आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार दिलेला असला तरी प्रशासक म्हणून त्यांच्याकडे कार्यभार असल्याचा उल्लेख त्यांना दिलेल्या पत्रात नव्हता.

त्यामुळे गोंधळाचे वातावरण होते. पवार यांच्या रूपाने नवीन आयुक्त मिळाल्याने नगरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र मंगळवारी सकाळी यात नवा ट्वीस्ट आला. मंत्रालय स्तरावर जोरदार हालचाली वाढल्या आणि नियुक्तीचा आदेश असूनही देविदास पवार हवालदील झाले.

त्यांच्या नावाने निघालेला बदली आदेश रद्द करून त्यांच्याऐवजी यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली वाढल्या. त्यामुळे नगरचा आयुक्त कोण, याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.

पवार यांना थांबवले ?
महापालिकेच्या आयुक्तपदी देविदास पवार यांची नियुक्ती केल्याचे शासनाने काढल्यानंतर अवघ्या काही तासानंतर त्यांना रूजू होण्यापासून थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. नगरविकास विभागाकडूनच याबाबत त्यांना सूचना दिल्याचे बोलले जाते. पवार मात्र दिवसभर आदेश कायम रहावा, यासाठी प्रयत्नात होते.

काँग्रेस आक्रमक
नगर मनपाला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. फरार आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचा पीए देशपांडे हे अँटी करप्शनच्या ट्रॅप मध्ये सापडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. ज्या राजकीय नेतृत्वाने त्यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती त्यांचा या भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी आटापिटा सुरू आहे.

या जागी मनपा प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या देविदास पवार यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती. मात्र भ्रष्टाचाऱ्यांना वाचवू पाहणाऱ्या नेतृत्वाला पवार यांच्या ऐवजी नगर मनपा मध्ये यापूर्वी उपायुक्त म्हणून अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या यशवंत डांगे यांना आयुक्तपदी बसवण्यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावण्याची दुर्बुद्धी झाली.

मनपा लुटून खाण्याचा काहींचा डाव आहे. हे शहराच्या दृष्टीने अत्यंत दुर्भाग्यशाली आहे. राज्य सरकारने डांगे यांच्या नियुक्तीचा फेरविचार करत तात्काळ रद्द करावी अशी मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe