अभिमानास्पद ! अहमदनगरमध्ये खताच्या दुकानात काम करणाऱ्या मजुराचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

वाळूचे कण रगडीता तेलही गळे अशी आपल्याकडे एक म्हण आहे. जर परिश्रम घेतले व चिकाटी असेल तर यश हमखास मिळते असे म्हटले जाते. समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत की जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परिस्थितीही झुकवतात. असेच एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातून समोर आलेय. खताच्या दुकानात काम करणाऱ्या मजुराचा मुलगा थेट पोलिस उपनिरीक्षक झालाय.

Ahmednagarlive24 office
Published:
api

Ahmednagar News :  वाळूचे कण रगडीता तेलही गळे अशी आपल्याकडे एक म्हण आहे. जर परिश्रम घेतले व चिकाटी असेल तर यश हमखास मिळते असे म्हटले जाते.

समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत की जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परिस्थितीही झुकवतात. असेच एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातून समोर आलेय. खताच्या दुकानात काम करणाऱ्या मजुराचा मुलगा थेट पोलिस उपनिरीक्षक झालाय.

विशाल अशोक शिंदे असं या मुलाचे नाव आहे. अशोक शिंदे हे विशालचे वडील. ते राशीन येथील अजयकुमार रमणलाल दोशी यांच्या खताच्या दुकानात काम करत. आज याच मजुराचा मुलगा विशाल अशोक शिंदे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

कृषी सेवा केंद्राचे संचालक अजयकुमार दोशी व राशीन ग्रामस्थांनी विशाल यांचा सत्कार केला. यावेळी विशालचे वडील अशोक शिंदे, व्यापारी अजयकुमार दोशी,

अविनाश दोशी, विपुल दोशी, विशाल दोशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विशालचे दहावीपर्यंतचे शिक्षण राशीन येथे झाले. पुढे बी.ई मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये पदवी घेतली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेते जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून यश संपादन केले.

विशाल शिंदे म्हणाले, माझ्या यशात आई-वडील, शिक्षक, तसेच मित्रांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मला नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. विशाल यांचे यश, जिद्द ही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध परीक्षा घेण्यात येतात. एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत अहमदनगरमधील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी आपला डंका वाजवला.

कुणी टेम्पोचालकाचा तर कुणी शेतकऱ्याचा मुलगा, पण खडतर प्रयत्न, अपुऱ्या सोयी-सुविधांवर मात करत या विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. खडतर मार्गावर चालणाऱ्या व बऱ्याचदा निराश होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यार्थी आदर्श ठरतायेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe