Ahmednagar News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या खात्यावर दोन दिवसांपासून तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
बहुतांशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. ज्यांचे लिंकींगचे काम अपूर्ण आहे ते खाते आधारही लिंक झाले की त्यांना पैसे मिळणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात १९५ कोटींची रक्कम वर्ग
अहमदनगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत तब्बल ६ लाख ५० हजार ‘लाडक्या बहिणींना’ सरकारने १९५ कोटींची रक्कम वर्ग केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर लवकरच दुसऱ्या टप्प्यातील दोन लाखांहून अधिक बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६ लाख ९२ हजार महिलांनी योजनेसाठी अर्ज सादर केल्याचे पुढे आले. या अर्जाची पडताळणी झाली. यातून १ लाख ३२ हजार महिलांच्या बँक खात्याला आधार लिंकींग नसल्याचे निदर्शनास आले.
संबंधितांना १४ ऑगस्ट रोजी तातडीने मोबाईलवर संदेश देऊन तसेच पंचायत समितीतून थेट फोन करून आधार लिकींगच्या सुचना करण्यात आल्या. त्यामुळे यातील सुमारे १ लाख महिलांनी बँकेत जाऊन आधार लिकींग करून घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत सुमारे ६ लाख ५० हजारांपेक्षा अधिक महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत. उवर्रीत ३० ते ३५ हजार महिलांची रक्कमही आधार लिकींग तसेच बैंक अकाऊंट समस्या दूर करताच लवकरच वर्ग होणार आहे.
पैसे आले नाहीत, काय करावे लागेल?
पैसे आले नाहीत हे करा बैंक खाते आधारशी लिंक आहे की, नाही हे तपासून पाहा. बँक खाते लिंक नसेल तर ते तातडीने करून घ्या.
नारीशक्ती दूत अॅपवर अर्ज पेंडिंग आहे की, ऍप्रूव्ह आहे हे तपासा. मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का, हे तपासा. मेजेस आला असेल तर तत्काळ त्रुटींची पूर्तता करा.