पाणलोटात जोर’धार’ ! मुळा किती भरले? डावा-उजव्या कालव्यातून किती पाणी सोडणार? जायकवाडीकडे किती विसर्ग? पहा.

मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर काल सोमवारी जोरदार पाऊस झाला. मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.

mula dam

Ahmednagar News : मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर काल सोमवारी जोरदार पाऊस झाला. मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.

सोमवारी झालेल्या पावसाने राहुरी परिसरात तब्बल दोन तास हजेरी लावून पाणी-पाणी केले. दरम्यान, पाणलोट क्षेत्रावरही पाऊस बरसल्याने मुळा धरणातील आवक वाढणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.

मुळा धरणाचा पाणीसाठा २३ हजार ४९ दलघफू म्हणजे ८८.६५ टक्के भरले आहे. सध्या ७९५ क्युसेक्स आवक सुरू आहे.

सोमवारी उजव्या कालव्यातून ७०० क्युसेक तर डावा कालव्यातून २७० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडलेले होते. १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट प्रयत्न नदीपात्रात ४६८ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला असल्याची माहिती समजली आहे.

१५ ते १९ ऑगस्ट या चार दिवसात कोतूळकडून मुळा धरणात १६३ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आलेय.

डावा व उजवा कालवा सुरू !
धरणसाठा २४ हजार ८८४ दलघफू होताच पाणी सोडण्याचा निर्णय झाला. डावा कालवा १५० क्यूसेक तर उजवा कालवा ७०० क्यूसेक प्रवाहाने वाहत आहे.

डाव्यावर ४३.०४ दलघफू तर उजव्या कालव्यावर ११६.६९ दलघफू पाणी खर्च झाले आहे. पाऊस पडल्याने दोन्ही कालव्याचा विसर्ग कमी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची मागणी थांबल्यास कालवे बंद केले जाणार आहे.

जायकवाडीचा विसर्ग थांबवला होता
मुळा पाटबंधारे विभागाने आवक पाहता पाण्याचा विसर्ग थांबविला होता. जायकवाडीच्या दिशेने ४ दिवस पाणी वाहत असताना सांडव्यातून पडणाऱ्या फेसाळ पाण्याचे निसर्गदृष्य पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची धरण स्थळी गर्दी होत होती.

परंतु १५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता आवक अत्यल्प झाल्याने दरवाज्यातून वाहणारा विसर्ग थांबविला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe