सख्ख्या भावाचा खून ! दारु पिऊन एकमेकांना मारहाण, अहमदनगर हादरले

किरकोळ कारणावरून सख्या भावाने डोक्यात मारहाण करून भावाचा खून केला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याबाबत मंगळवारी दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : किरकोळ कारणावरून सख्या भावाने डोक्यात मारहाण करून भावाचा खून केला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याबाबत मंगळवारी दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

नगर शहरातील सावेडी उपनगरातील सपकाळ चौक परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात घरमालकाने फिर्याद दिली असून, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

स्वप्नील मुळे (सध्या रा. भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड), असे घटनेतील मयताचे नाव आहे, तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्वप्नील मुळे (सध्या रा. भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड), असे घटनेतील मयताचे नाव आहे, तर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घरमालक संजय लक्ष्मण सोनवणे (वय ४७, रा. भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शुभम व स्वप्निल दोघे सोनवणे यांच्या भिंगारदिवे मळ्यातील खोलीमध्ये एकत्र राहत होते. दोघांनाही दारूचे व्यसन होते.

त्याचे दोघांचे नेहमी भांडण होत असे. स्वप्निल हा चालक होता. तर, शुभम चहाच्या टपरीवर काम करीत होता. संजय सोनवणे सोमवारी त्यांच्या ढवण वस्ती येथील घरी होते. त्यावेळी त्यांच्या मुलगा तिथे गेला.

त्याने सांगितले स्वप्निल व शुभम यांचा वाद झाला असून, स्वप्निल याच्या नाकातून रक्त येते आहे. त्यानंतर लगेच भिंगारदिवे मळा येथे येवून स्वप्निल याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले.

तिथे शुभमही होता. उचारादरम्यान स्वप्निल याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभम मुळे याला अटक केली आहे. तोफखाना पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

नेमके काय घडले ?
भिंगारदिवे मळा येथे मागील तीन महिन्यांपासून स्वप्नील मुळे व शुभम ऊर्फ बंड्या मुळे हे दोघे खोली भाड्याने घेऊन राहत होते. स्वप्नील व शुभम यांनी सोमवारी सायंकाळी एकमेकांना दारू पिऊन मारहाण केली.

रात्री उशिरा स्वप्नीलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे घरमालक संजय सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe