अहमदनगरमधील पहिलं गाव ! गावकऱ्यांनी एकत्र येत साकारला नदीजोड प्रकल्प, एक हजार एकर जमीन ओलिताखाली

गाव करी तेथे राव काय करी अशी एक आपल्याकडे म्हण आहे. गावकऱ्यांनी जर मनात आणलं तर काहीही अशक्य नसत. अहमदनगरमधील एका गावाने हे सिद्ध करून दाखवलंय. या गावाने, सरपंचाने एकत्र येत थेट नदीजोड प्रकल्पच साकारलाय.

Ahmednagarlive24 office
Published:
pani

Ahmednagar News : गाव करी तेथे राव काय करी अशी एक आपल्याकडे म्हण आहे. गावकऱ्यांनी जर मनात आणलं तर काहीही अशक्य नसत. अहमदनगरमधील एका गावाने हे सिद्ध करून दाखवलंय. या गावाने, सरपंचाने एकत्र येत थेट नदीजोड प्रकल्पच साकारलाय.

या प्रकल्पाने गावातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. ही किमया केलीये, काळकूपकरांनी. काळकूपजवळून कापरी नदी वाहत असतानाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नव्हता.

या नदीचे वाहून जाणारे पाणी गावातील मध्यवर्ती असलेल्या तलावामध्ये आणणे आवश्यक होते. गावातील तलाव कधीतरी भरत असल्याने तलाव असूनही त्याचा फारसा फायदा होत नव्हता. कै. भागाशेठ खरमाळे यांनी या नदीजोड प्रकल्पासाठी प्रयत्नही केले.

त्यांच्या पश्चात सरपंच ताराबाई कदम सरपंच झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला सरपंचपदाचा मान दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

पाईप अस्तरीकरणासह मोठ्या पाईपची या प्रकल्पासाठी आवश्यकता होती. ही संकल्पना खा. लंके यांच्यासमोर मांडण्यात आल्यानंतर त्यांनी पाईप अस्तरीकरण, तसेच मशिनरीसाठी मदत व मार्गदर्शन केले. भाऊसाहेब खरमाळे, राजेंद्र कदम, किसन शिंदे, मच्छिंद्र खरमाळे,

पांडुरंग कदम, आबासाहेब मते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी या कामात महत्वाची भूमिका बजावली. या योजनेसाठी ७१ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. भागाशेठ कदम यांनी १२ ते १३ लाख रुपयांच्या मदतीचे योगदान दिले.

ग्राम निधीतून २ लाख ७५ हजार, लोकवर्गणी ५ लाख ५० हजार, वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे संतोष चौधरी यांनी इटन कंपनीकडून १८ लाख रुपयांची मदत मिळवून दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe