Ahmednagar News : साईबाबा यांची नगरी अर्थात साईनगरीत हजारो भावीक येतात. शिर्डीत विविध राज्यातील भाविक दर्शनासाठी रीघ लावत असतात. हजारो भाविक येथे येत भक्तीची अनुभूती घेतात.
परंतु याच शिर्डीत आता वस्तू गायब होण्याचे प्रमाण वाढलेय. म्हणजेच शिर्डी बर्म्युडा ट्रँगल बनतंय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
बर्म्युडा ट्रॅगलमध्ये वस्तू आश्चर्यकारकरीत्या गायब होतात तस इथं घडतयय. आता हे ऐकून जरा तुम्हाला विचित्रच वाटलं असेल. त्याच झालंय असं, शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून, कुणाकडूनही, कधीही वस्तू हरवली जाऊ शकते.
भाविकच नाही तर ग्रामस्थही याला अपवाद नाहीत. मोबाइल हातातून हिसकावून पळणाऱ्या, चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्या येथे कार्यरत आहेत. रोज शहराच्या विविध भागात, बाजारात या प्रकारचे गुन्हे सुरू आहेत.
परंतु येथील पोलीस ठाण्यात चोरी ऐवजी या गुन्ह्यांच्या नोंदी हरवल्या किंवा गहाळ झाल्या, असे सांगत आहेत अशी चर्चा आहे.
म्हणजे एका मीडिया रिपोर्टनुसार चोरी झालं तर चोरलं असं न नोंदवता ते हरवलं असं नोंदवलं जात आहे असे म्हटले जात आहे. मोबाइल हिसकावला म्हटलं तर गुन्हा दाखल करावा लागेल,
शोधायचा नसला तरी कागदपत्रे रंगवावी लागतील, गुन्ह्याचा आलेख उंचावेल, असा सारासार विचार करून पोलिसांनी हा मार्ग काढला आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
२०२३ मध्ये वर्षभरात १४४७ तर यंदा जुलैअखेर ७७१ वस्तू हरवल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे.
हरवलेल्या वस्तू सामान्य माणसांना कशा सापडत नाहीत, वेगवेगळ्या हरवल्या तरी एकाच व्यक्तीकडे कशा सापडतात? असा प्रश्न देखील काहींना सतावत आहे.