Ahmednagar News : लंके यांच्या विजयाचा राहुरीत जल्लोष : आमदार प्राजक्त तनपुरे यांचे प्रयत्न सफल

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके यांनी बाजी मारत विजय मिळवला. न भूतो न भविष्यती असा निकाल लागला असून यामध्ये लंके सुमारे ३० हजार मतांनी विजयी झाले आहेत. या विजयाचा राहुरी तालुक्यात महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.

अहमदनगर दक्षिणच्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही १३ मे रोजी संपन्न झाली होती. यामध्ये दक्षिण मतदार संघातून १२ लाख ६३ हजार ७८१ मतदारांनी मतदान केले होते. राहुरी तालुक्यात २ लाख १७ हजार ५६५ असे एकूण ७१ टक्के मतदान झाले होते. मतदान घडवून आणण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पुढाऱ्यांनी कंबर कसली होती.

यामध्ये दक्षिण मतदारसंघात सुमारे ६४ टक्के मतदान झाले होते. राहुरी विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून विखेंचा बालेकिल्ला असल्यामुळे या मतदारसंघाच्या मताधिक्याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते; परंतु या ठिकाणी विखे व लंके हे थोड्याफार प्रमाणात बरोबरीत चालले. आमदार प्राजक्त तनपुरे व त्यांचे सर्व समर्थक कार्यकर्ते तसेच तनपुरे परिवार यांनी झटून काम केले.

मागील निवडणुकीत विखे यांना ७० हजार मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम राहील, अशी अनेकांची अपेक्षा होती. तो त्यांचा अपेक्षा भंग झाला. अखेर राहुरी कोणालाच समजली नाही; मात्र कर्जत, जामखेड, पारनेर आदी भागातून लंके यांनी मुसंडी मारली. सुमारे ३० हजार मतांनी निलेश लंके यांचा विजय झाला.

राहुरी शहरात आमदार तनपूरे यांचे संपर्क कार्यालय, मल्हारवाडी रोड केशर पतसंस्थेसमोर सागर तनपुरे व त्यांचे सहकारी शनी चौक नंदकुमार तनपुरे व त्यांच्या सहकारी यांनी व बाजार समितीसमोर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नेते मंडळींनी एकत्र येऊन गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष संतोष आघाव, शहाजी ठाकूर, नंदकुमार तनपुरे, गोरक्षनाथ दुशिंग, मंजाबापू चोपडे, पांडू उदावंत, किशोर पातोरे, सोमनाथ बाचकर, अवधूत शिरसाठ, गणेश वराळे, दत्तात्रेय पानसंबळ, मंजाबापू कोबरणे, बापूराव कोबरणे, विजय कोबरणे, दीपक साळवे, किरण साळवे, अशोक आहेर, नरेंद्र शिंदे, अरुण तनपुरे शनी चौकात नंदकुमार तनपुरे आदींनी ढोल ताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. राहुरी तालुक्यात म्हैसगाव, उंबरे, ब्राम्हणी, येवले आखाडा, कणगर, बारागाव नांदूरसह अनेक गावात जल्लोष करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe