Ahmednagar News : पावसाळ्याची सुरवात चांगली झाली. अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेतील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर उत्तरेत पाणलोटातही चांगला पाऊस झाला. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता पुन्हा एकदा आभाळाकडे लागल्या आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यात पाऊस कधी पडेल याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी अंदाज वर्वतलाय.
२ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस
येत्या १९ ऑगस्टपासून पाथर्डी तालुक्यातील करंजी, मिरीसह पश्चिम भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. २ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी मुगासह इतर पिकाची काढणी उरकून घ्यावी, असे आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे.
जोरदार पावसाला सुरुवात
दौंडकडे (जि. पुणे) जात असताना करंजी बायपासवरील दगडवाडी फाट्यानजीक शुक्रवारी सकाळी येथे जमलेल्या शेतकऱ्यांसमोर ते बोलत होते. १९ ऑगस्टपासून पाथर्डी तालुक्यातील करंजी, मिरी, तिसगाव परिसरात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांनी नुकसान होऊ नये यासाठी…
या भागात मुगाचे पीक काढणीला आले असले तर शेतकऱ्यांनी नुकसान होऊ नये यासाठी काढून घ्यावे. मुगाची तोडणी उरकून घ्यावी. हा पाऊस पूर्वेकडून या भागात येणार आहे. २ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस होणार आहे. या भागाबरोबरच बीड, लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार असल्याचे डख यांनी यावेळी सांगितले.
विहिरींना भरपूर पाणी येऊन पिकांना जीवदान
पावसामुळे या भागातील लहान- मोठे तलाव, बंडींग, ओढे, नाले ओसंडून वाहू लागतील. तशी आज दुपारपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. या भागात पिकांची परिस्थिती चांगली दिसत असली तरी मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने विहिरींना अद्यापही पुरेसे पाणी आलेले नाही. या पावसामुळे या शेतकऱ्यांच्या विहिरींना भरपूर पाणी येऊन पिकांना जीवदान मिळेल, असेही डख यांनी सांगितले.