चारित्र्यावर संशय..पत्नीचा सपासप गळा चिरला, स्वतः पोलीस ठाण्यात गेला

अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दिसतात. आता महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. पतीनेच पत्नीचा गळा चिरला व हत्या केली.

murder

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दिसतात. आता महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. पतीनेच पत्नीचा गळा चिरला व हत्या केली.

चारित्र्यावर संशय असल्याच्या कारणातून ही हत्या झाली. धक्कादायक म्हणजे ही हत्या करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

ही घटना शेवगाव शहरात ब्राम्हण गल्लीत घडली. या घटनेनंतर आरोपी पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. सचिन दिलीप काथवटे (वय ३५, रा.ब्राम्हण गल्ली, शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे.

ही घटना शुक्रवारी (दि.२३) रोजी पाहटे दिड वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत सुरेश भिवाजी मोरे (रा. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी सचिन हा कायम आपली पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे, त्यातून त्यांचे सातत्याने वाद होत असत.

शुक्रवारीही त्यांचे वाद झाले होते. त्यातून आरोपीने पत्नीची चाकूच्या सहाय्याने गळा चिरून हत्या केली. या संदर्भात आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. समाधान नागरे व हे. कॉ. कैलास काळे करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचा विचार जर केला तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना वाढलेल्या दिसतात. हाणामारी, खून, चोऱ्या आदी घटना जिल्ह्यात जास्तच झालेल्या आहेत. यावर पोलिसांनी अंकुश ठेवला पाहिजे अशी इच्छा नागरिक व्यक्त करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe