अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात ‘झिका’सह स्वाइन फ्लूचेही रुग्ण ! सावधान..

सध्या विविध व्हायरल आजारांचे थैमान सुरु आहे. त्यातच आता झिका व्हायरसचे देखील रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये झिका सह स्वाईनफ्लूचे देखील रुग्ण आढळले आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
zika

Ahmednagar News : सध्या विविध व्हायरल आजारांचे थैमान सुरु आहे. त्यातच आता झिका व्हायरसचे देखील रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये झिका सह स्वाईनफ्लूचे देखील रुग्ण आढळले आहेत.

संगमनेर शहरात झिका विषाणूचे दोन रुग्ण व तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागांमध्ये आरोग्य विभागामार्फत आरोग्य सर्वेक्षणाचे कामकाज सुरू झाले आहे.

सर्वेक्षणात लक्षणे आढळून आलेल्या शहरातील नागरिकांची आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली जाते आहे. दि.२५ मे रोजी संगमनेर तालुक्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला होता.

उपचारानंतर हा रुग्ण बरा झाला आहे. रुग्ण आढळून आलेल्या भागात आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना, यात जलद ताप सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, धूरफवारणी करण्यात आली होती,

तसेच गुरुवारी (दि.१८) शहरी भागात पुन्हा दोन रुग्ण आढळून आले. यात दोन गर्भवती महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागात प्रामुख्याने ताप, डोळे लाल होणे, सांधेदुखी, अंगदुखी व अंगावर पुरळ येणे, अशी लक्षणे असलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते आहे.

गर्भवती असाल तर काळजीची जास्त गरज
प्रामुख्याने सौम्य लक्षणे असली तरीही गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गर्भवती महिलांमध्ये जन्माला येणाऱ्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो.

त्यात प्रामुख्याने डोके लहान असणे, मेंदूची वाढ खुंटणे किंवा डोळ्यांचे विकार, ऐकू न येणे, जन्मतःच व्यंग होण्याची शक्यता असते, असेही डॉ. घोलप यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe