भीषण ! थेट दुधसंकलन केंद्रात चारचाकी घुसली, त्यानंतर..

अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांच्या मालिका सुरूच असून आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दूध संकलन केंद्रात घसून अपघात झाला असल्याची घटना घडली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
apghat

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांच्या मालिका सुरूच असून आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दूध संकलन केंद्रात घसून अपघात झाला असल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली आहे.

या घटनेत संकलन केंद्राचे मोठे मोठे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. वांबोरी येथे जिल्हा परिषद विश्राम गृहाजवळील चौकात गांधले यांचे दूध संकलन केंद्र आहे.

मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास भरधाव चार चाकी गाडी गांधले दूध संकलन केंद्राला धडकली. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकही घटनास्थळी पोहोचले.

गाडीच्या एअर बॅग उघडल्यामुळे कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती समजली. परंतु, दूध केंद्राच्या काँक्रिटच्या भिंती पडल्या असून,

केंद्रातील साहित्यो नुकसान झाले. तसेच गाडीचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, वांबोरी दूरक्षेत्राकडे उशिरापर्यंत याबाबत कोणतीही नोंद झाली नव्हती.

दुसऱ्या घटनेत चारचाकी-ट्रकच्या अपघातात तरूण ठार
चारचाकी व ट्रकच्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर-मनमाड महामार्गावरील विळद (ता. नगर) शिवारात घडली. रूपेश मच्छिंद्र राऊत (वय २९ रा. केंदळ ता. राहुरी) असे मृत तरूणाचे नाव आहे.

त्यांचा चुलत भाऊ भाऊसाहेब कचरू राऊत (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील अज्ञात चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रूपेश १३ जुलैला पुणे येथून केंदळ येथे महिंद्रा बोलेरो घेऊन येत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास विळद शिवारात बोलेरोला ट्रकने धडक दिली. या धडकेत रूपेश यांचा मृत्यू झाला. ट्रक चालक तेथून पळून गेला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe