तर्रर्र नगरी ! अहमदनगरच्या तरुणांची गोव्यात तुंबळ मारामारी

गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक बऱ्याचदा दारूच्या नशेत तर्रर्र होत धिंगाणा घालतात. यामध्ये बऱ्याचदा त्यांच्यात व स्थानिकांच्यात वाद देखील होतात. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील काही लोकांनी गोव्यात फिरायला गेल्यानंतर दारूच्या नशेत मोठा 'राडा' केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Published on -

Ahmednagar News : गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक बऱ्याचदा दारूच्या नशेत तर्रर्र होत धिंगाणा घालतात. यामध्ये बऱ्याचदा त्यांच्यात व स्थानिकांच्यात वाद देखील होतात.

दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील काही लोकांनी गोव्यात फिरायला गेल्यानंतर दारूच्या नशेत मोठा ‘राडा’ केल्याचे पाहायला मिळाले आहे. दारूच्या नशेत या लोकांनी आपापसातच हाणामारी केली असून ड्रायवरला रक्तभंबाळ होईपर्यंत मारले आहे.

याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. समजलेली अधिक माहिती अशी : अहमदनगर मधील एकाच गावातील काही तरुण मौजमजा करण्यासाठी गोव्याला गेले होते. दारूच्या नशेत असताना त्यांच्यातच हाणामाऱ्या झाल्या.

त्यांनी ड्रायव्हरला चांगलेच झोडपले. मुंबई गोवा महामार्गावर हा प्रताप घडला. या महामार्गावरच गाडी बाजूला पार्क करत ड्रायव्हरने मदतीसाठी इतरांना हाका मारल्या. रस्त्यावरील एका प्रवाशाने पोलिसांना फोन करत याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथील आठ जणांनी धूम ठोकली. गाडीतील साउंडच्या आवाजावरून वाद होऊन हाणामार झाल्याचे चालक सांगत होता. दरम्यान यातील सर्वच लोक दारूच्या नशेत तर्रर्र होते असे सांगितले जात आहे.

गोव्यात दारू स्वस्त असल्याने अनेक पर्यटक तेथे जातात ते म्हणजे दारूचा आस्वाद घेण्यासाठी. बहुतांश मद्यप्रेमींसाठी गोवा म्हणजे दारूची पर्वणी. परंतु बऱ्याचदा याच दारूच्या नशेत अनेक समाज विघातक कामे देखील तरुण करतात हे मात्र चिंताजनक आहे.

अहमदनगरच्या तरुणांची ही बातमी समजताच व व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ही घटना निंदणीय असल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe