अहमदनगरमधील ‘त्या’ द्राक्ष बागायतदाराचा शेतात महिलेवर पाशवी अत्याचार

द्राक्षाच्या बागेमध्ये गवत खुरपणाऱ्या मजूर महिलेला बळजबरीने उसात ओढत नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा करण्याचा खळबळजनक प्रकार वाकडी, ता. राहाता येथे घडला आहे. याप्रकरणी द्राक्ष बागायतदार किशोर कारभारी यणगे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
crime

द्राक्षाच्या बागेमध्ये गवत खुरपणाऱ्या मजूर महिलेला बळजबरीने उसात ओढत नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा करण्याचा खळबळजनक प्रकार वाकडी, ता. राहाता येथे घडला आहे. याप्रकरणी द्राक्ष बागायतदार किशोर कारभारी यणगे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, सदर महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात या घृणास्पद कृत्याबाबत महिलेने म्हटले आहे की, परभणी जिल्हयात राहणारी ३५ वर्षीय मजूर महिला आपला पती, ३ मुलं यांच्यासह तालुक्यातील एका गावात ६ महिन्यांपूर्वी मोलमजूरीचे काम करण्यासाठी आले होते.

सदर महिला ही मिळेल ते मोलमजूरीचे काम करायची. ८ जुलैला ही महिला ही यणगे याच्या द्राक्ष बागेत गवत खुरपत होती. तिचे पती हे शेजारच्या द्राक्ष बागेत काम करत होते व मुलगा पायाला जखम झाल्याने घरीच होता.

दुपारी १२ च्या सुमारास सदर महिला एकटीच द्राक्ष बागेत गवत खुरपायचे काम करत असताना शेताचा मालक किशोर यणगे हा तेथे आला. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत यणगे याने या महिलेचा हाथ पकडला व द्राक्ष बागेच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेतात जबरदस्तीने या महिलेला ओढत नेले.

आरोपी याने तिला तू पळून गेली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी जिवे मारण्याची धमकी देत सदर महिलेला उसाच्या शेतात तिच्यावर पाशवी अत्याचार केला. सदर महिला ही बाहेर जिल्हयातील असल्याने व वाकडी परिसरात तिची ओळख नसल्याने तिने हा प्रकार

आपला भाऊ, भावजई तसेच आई वडील यांना फोन करून सांगितला. नातेवाईकांसोबत येवून सदर महिलेने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी किशोर कारभारी यणगे, रा. वाकडी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe