शेततळ्याचा शाप? १८ जणांचा बुडून मृत्यू, अहमदनगरमधील ‘त्या’ घटनांनी चिंता

अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासूनचा अढावा घेतला तर लक्षात येईल की, शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. समृद्धी आणण्यासाठी केलेली शेततळी हलगर्जीपणामुळे शाप ठरत आहेत.

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासूनचा अढावा घेतला तर लक्षात येईल की, शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. समृद्धी आणण्यासाठी केलेली शेततळी हलगर्जीपणामुळे शाप ठरत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील केवळ संगमनेर तालुक्याचा विचार केला तर पाच वर्षांत शेततळ्यांत पडून अठरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा आकडा घेतला तर हा आकडा देखील धडकी भरवणारा असेल.

शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय व्हावी म्हणून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना शेततळे निर्मितीसाठी साहाय्य केले जाते. या योजनेचा संगमनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला असून, बागायती शेती होण्यास मदत झाली आहे.

परंतु, या शेततळ्यांत पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सन २०२० पासून आतापर्यंत तालुक्यात अठरा जणांचा शेततळ्यांत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून मदत केली जात आहे. आतापर्यंत १८पैकी १३ जणांच्या वारसांना या योजनेतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची अशी एकूण २६ लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे.

हलगर्जीपणा नको, खबरदारी घ्या
शेतकऱ्यांनी खबरदारीची सर्व काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेततळे आहेत, त्यांनी शेततळ्यात रस्सी, ट्यूब सोडणे, सर्व बाजूंनी संरक्षक कंपाउंड असावे.

दरवाजा नेहमी बंद असावा. या सर्व उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी असे अपघात झाले आहेत अशा बहुतांश ठिकाणी असे खबरदारीचे उपाय केले नसल्याचे दिसून आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe