विद्यार्थिनीला अल्पवयीन मुलांनी भररस्त्यातून पळवले, त्यानंतर.. अहमदनगरमधील थरार

शाळेतून घरी चाललेल्या नऊ वर्षाच्या लहान मुलीला पळून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. ३०) दुपारी घडली. पळवून नेणारे अल्पवयीन होते. सोबतच्या मुलांनी आरडा ओरड केल्यानंतर पळून जाणाऱ्या अल्पवयीन तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Published on -

Ahmednagar News : शाळेतून घरी चाललेल्या नऊ वर्षाच्या लहान मुलीला पळून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. ३०) दुपारी घडली. पळवून नेणारे अल्पवयीन होते. सोबतच्या मुलांनी आरडा ओरड केल्यानंतर पळून जाणाऱ्या अल्पवयीन तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले.

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी शिवारात हा प्रकार घडला. याप्रकरणी चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तीन अल्पवयीन तरुणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : मंगळवारी (दि. ३०) दुपारी पावणेदोनच्या सुमारास नऊ वर्षांची लहान मुलगी अन्य विद्यार्थ्यांसह शाळेतून घराकडे चालली होती.

वांगदरी शिवारातील तिरमलवस्तीजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी या चिमुकलीला पळविण्याचा प्रयत्न केला. अन्य विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी जमा झाल्याने त्या तरुणांनी चिमुकलीला मुलीला सोडून देत तेथून पळ काढला.

ग्रामस्थांनी पाठलाग करून त्या तरुणांना पकडले. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पुढील तपास करीत आहेत.

सुप्यात पोलिसाकडून एकाला मारहाण
सुपे येथे नगर-पुणे रस्त्यावर फिरत असलेल्या गावातील एका व्यक्तीस सुपे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने लाथांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची दखल पोलिस अधीक्षकांनी घेतली आहे.

याबाबत माहिती अशी की, सुपे पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या वाहतूक पोलिसाने एका व्यक्तीला भररस्त्यात लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची दखल पोलिस अधीक्षकांनी घेतली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe