दर्शनासाठी अहमदनगरमधील गोरक्षनाथ गडावर गेलेल्या वारकऱ्यांचा टेम्पो उलटला

Pragati
Published:
apghat

Ahmednagar News : दर्शनासाठी गोरक्षनाथ गडावर गेलेल्या वारकऱ्यांचा एक टेम्पो परतत असताना पलटी झाल्याचे वृत्त आले आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पंढरपूर पायी दिंडी सोहळा सोमवारी डोंगरगण येथे मुक्कामी आलेला होता.

यामधील एक पिकअप दर्शन करावे या हेतूने गोरक्षनाथ गडावर पोहोचला. दर्शन झाल्यानंतर ते गडावरून परतत असताना हा भाविकांचा पिकअप पलटी झाला. यामध्ये असणारे दहा ते पंधरा भाविकांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना सोमवारी (दि. १) रोजी सायंकाळी वाजता घडली.

मंदाबाई सुदाम थोरे (रा. गोळेगाव, ता. वैजापूर), शाहुबाई मगर (रा. श्रीरामपूर), इमल चांगदेव आंबले (रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपर), चांगदेव ज्ञानदेव आंबले, राजू मिसाळ, बाळासाहेब रंगनाथ खोपसे, संभाजी नासाहेब हरगुडे, भाऊसाहेब जगताप, नवनाथ तांबे, (ता. श्रीरामपूर) असे किरकोळ जखमी झालेल्या भाविकांचे नावे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

जखमींना तत्काळ उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपुरला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडी नगर तालुक्यातील डोंगरगण येथे सोमवारी (दि.१) मुक्कामी येणार होती.

त्यातील दिंडीतील काही भाविक मांजरसुंबा येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर दर्शनासाठी गेले होते. दर्शनाहून परताना घाटातील पहिल्या वळणावर पिकअपचे ब्रेक फेल झाल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला उलटला.

या घटनेची माहिती माहिती समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक माणिक चौधरी, गावातील ग्रामस्थ सागर कदम, विक्रम कदम, सागर वाघमारे, आदींनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe