ट्रकने अंत्यविधीवरून येणाऱ्या गावकऱ्यांना चिरडलं ! पाच ठार, कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात

कल्याण नगर महामार्गावर एक भीषण घटना घडल्याचे वृत्त आले आहे. अंत्यविधीवरुन परतत असणाऱ्या नागरिकांना ट्रकने चिरडले आहे. यात पाच गावकरी ठार झाले आहेत.

Published on -

Ahmednagar News : कल्याण नगर महामार्गावर एक भीषण घटना घडल्याचे वृत्त आले आहे. अंत्यविधीवरुन परतत असणाऱ्या नागरिकांना ट्रकने चिरडले आहे. यात पाच गावकरी ठार झाले आहेत.

गावातील व्यक्तीचा अंत्यविधी कार्यक्रम उरकून येत असताना ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाले असून रास्ता रोकोची भूमिका नागरिकांनी घेतली असल्याची माहिती समजली आहे.

अधिक माहिती अशी : जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे ग्रामस्थ एका व्यक्तीच्या अंत्यविधिवरून परतत होते. त्यावेळी त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने चिरडलं. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी तातडीने दवाखान्यात हलवले होते. अपघातानंतर नागरिकांनी कल्याण नगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु केले होते अशी माहिती समजली आहे.

डंपरखाली चिरडून एकाचा मृत्यू , स्टोन क्रशरवरील घटना
दगड व खडी वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीच्या हायवा या अवजड वाहनाखाली सापडून स्टोन क्रशरवरील परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात असलेल्या एस. आर. स्टोन क्रशरच्या आवारात बुधवारी (दि.१७) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली.

मनोज प्रकाश कुमार (मूळ रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश, हल्ली रा. खंडाळा, ता. नगर) असे मयत कामगाराचे नाव आहे. मयत मनोज प्रकाश कुमार हा नगर तालुक्यातील खंडाळा शिवारात राहुल लोटके यांच्या एस. आर. स्टोन क्रशर येथे कामास होता.

बुधवारी दुपारी क्रशरवर वाहन चालक दत्तात्रय मल्हारी वाडेकर (रा. धोंडेवाडी, वाळकी, ता.नगर) हा टाटा कंपनीच्या हायवा घेवून खडी भरण्यासाठी क्रशर वर आला होता. वाहनात खडी भरल्यावर तो तेथून जात असताना, त्यांच्या वाहनाखाली सापडून मनोज प्रकाश कुमार हा मयत झाला.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe