…तर आम्हालाही मशिदीमध्ये येऊन महाआरती करावी लागेल, अहमदनगरमध्ये नितेश राणेंच भडक वक्तव्य,अन..

हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी मी आलो असून, आमचे हनुमान मंदिर, सिद्धिविनायक मंदिराजवळ अतिक्रमण करण्याची हिंमत करत असाल आम्हालाही मशिदीमध्ये येऊन महाआरती करावी लागेल, तुम्ही कोणीही आम्हाला थांबवू शकणार नाहीत.

nitesh rane

Ahmednagar News : हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी मी आलो असून, आमचे हनुमान मंदिर, सिद्धिविनायक मंदिराजवळ अतिक्रमण करण्याची हिंमत करत असाल आम्हालाही मशिदीमध्ये येऊन महाआरती करावी लागेल, तुम्ही कोणीही आम्हाला थांबवू शकणार नाहीत.

पोलिसांनीही फक्त कायदा व सुव्यवस्था आम्हालाच फक्त शिकवू नये, असा सज्जड इशारा देत आ. नितेश राणे यांनी कर्जत येथील हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून हिंदूंना जागे करण्याचे काम केले.

येथील कापरेवाडी वेस येथील हनुमान मंदिराजवळ व सिध्दटेक येथे सिध्दी विनायकाच्या मंदिराच्या बाहेर मुस्लिम धर्मीयांकडून होत असलेल्या अतिक्रमणांविरुद्ध कर्जत येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

भांडेवाडी येथील अक्काबाई नगर येथून हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली, संत श्री गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर हा मोर्चा कापरेवाडी वेशीतून बाजारतळावर आल्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

या मोर्चात भगवे पंचे घालून मोठ्या संख्येने युवक व महिला सहभागी झाले होते. या वेळी हिंदू रणरागिनी हर्षदा ठाकूर यांनी हिंदू समाजातील मुलींना व महिलांना लव्ह जिहादच्या नावाने मुस्लिम व्यक्ती फसवत आहेत. बांगलादेशात हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत, त्यामुळे आपल्याला एकत्र यावे लागेल, असे आवाहन केले.

या वेळी आ. नितेश राणे यांनी लव्ह जिहाद व लॅन्ड जिहादच्या माध्यमातून महाराष्ट्रात कर्जतमध्ये हिंदूची संख्या कमी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. आपल्या देशात शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न असून, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मान्य नाही, त्यांना आपले वेगळे वक्फ बोर्ड पाहिजे,

वेगळे मुस्लिम बोर्ड पाहिजे, पण आता आपण शांत बसून चालणार नाही, हे लोक हनुमान मंदिराच्या परिसरात अतिक्रमण करणार असेल तर आपण काय फक्त बघतच बसणार आहात का,

सिध्दटेक येथे हे मंदिराच्या बाहेर अतिक्रमण करतायत, तरी आपल्यातील कोणी जाब विचारायला तयार नाहीत. प्रशासनाने ही अतिक्रमणे काढवीत, असे आ. राणे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe