नगर कल्याण मार्गावर दोन कार व दुचाकीचा अपघात ! गर्भवतीच्या पोटावरून चाक गेले, पळून जाताना कारचालकाचाही धडकून मृत्यू..

नगर कल्याण रोडवर दोन कार व एका दुचाकीचा अपघात झाला. कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला उडून रस्त्यावर पडल्या. त्या गरोदर होत्या. या धडकेत महिलेच्या पोटातील सात महिन्यांच्या बाळाचा (गर्भ) मृत्यू झाला. अपघातानंतर तो कारचालक कारसह पळून जाताना दुसऱ्या एका हॉटेलसमोर दुसऱ्या कारला धडकला.

Published on -

Ahmednagar News : नगर कल्याण रोडवर दोन कार व एका दुचाकीचा अपघात झाला. कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला उडून रस्त्यावर पडल्या.

त्या गरोदर होत्या. या धडकेत महिलेच्या पोटातील सात महिन्यांच्या बाळाचा (गर्भ) मृत्यू झाला. अपघातानंतर तो कारचालक कारसह पळून जाताना दुसऱ्या एका हॉटेलसमोर दुसऱ्या कारला धडकला.

त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेत दोन कार व दुचाकीचा अपघात होऊन एका कार चालकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. याच अपघातातील जखमी महिलेच्या पोटातील सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप उत्तम तरटे (वय २४, रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश भानुदास दुधाडे (रा. लोणी हवेली, ता. पारनेर) असे अपघातात मयत झालेल्या कार चालकाचे नाव आहे.

हा अपघात रविवारी (दि. १४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. फिर्यादी व त्यांच्या पत्नी मनिषा हे दोघे कल्याण रोडवरील एका रुग्णालयात नोकरीस आहेत. रविवारी रात्री ते काम संपवून दुचाकीवरून कल्याण रोडने घरी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने

आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की फिर्यादीच्या पत्नी दुचाकीवरून उडून रस्त्याच्या डाव्या बाजूला पडल्या. त्यांच्या पोटावरून कारचे पुढचे चाक गेल्याने त्या मोठ्याने ओरडल्या.

तेवढ्यात चालकाने कार मागे पुढे करून फिर्यादीच्या पत्नीला जोराची धडक देऊन सुसाट वेगाने निघून गेला.  पुढे जावून त्याने दुसऱ्या एका कारला जोराची धडक दिली. त्यात कारचालक दुधाडे याचाही मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe